राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे यांच्या पाठपुराव्याला यश नांदेड : नांदेड जिल्ह्यातील तसेच नायगाव तालुक्यातील बरबडा, घुंगराळा, नरसीसह

राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे यांच्या पाठपुराव्याला यश
नांदेड : नांदेड जिल्ह्यातील तसेच नायगाव तालुक्यातील बरबडा, घुंगराळा, नरसीसह अनेक महसूल मंडळांतील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून पीकविमा रकमेच्या प्रतीक्षेत होते. या वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर मोठे यश आले असून, शेतकऱ्यांच्या खात्यावर पीकविम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
पीकविम्याच्या प्रश्नावर वसंत सुगावे यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांची दोन वेळा प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले होते. याशिवाय जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच पीकविमा कंपनी यांच्याकडे सातत्याने बैठका घेऊन हा विषय लावून धरला होता. सुगावे पाटील यांच्या या प्रयत्नांची दखल घेत कृषिमंत्र्यांनी कृषी विभाग आणि पीकविमा कंपनीला तातडीने निर्देश दिले.
त्यानंतर आता सावरखेड, रुई, वंजारवाडी, घुंगराळा, हिप्परगा, पाटोदा, बरबडा, आंतरगाव आदी गावांतील शेकडो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पीकविम्याची रक्कम वर्ग होण्यास सुरुवात झाली आहे. आगामी खरीप हंगामाच्या तोंडावर हक्काचा विमा खात्यात जमा झाल्याने शेतकऱ्यांनी वसंत सुगावे पाटील यांचे आभार मानले आहेत. सुगावे पाटील यांच्या या यशामुळे संपूर्ण परिसरातील शेतकरी वर्गात समाधान आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS