उशिरा सुचलेलं शहाणपण

Homeताज्या बातम्यासंपादकीय

उशिरा सुचलेलं शहाणपण

मनसेचे अध्यक्ष स्वरराज ( राज ) श्रीकांत ठाकरे यांच्या भोंगा आणि हनुमान चालीसा संदर्भातील प्रक्षोभक भाषणाचा मोठा परिणाम महाराष्ट्रात झाला हे खरेच. यात

रशियाचे नरमाईचे सूर
‘अपघातमुक्त भारत’ मोहीम राबवा
राजकीय धुराळा

मनसेचे अध्यक्ष स्वरराज ( राज ) श्रीकांत ठाकरे यांच्या भोंगा आणि हनुमान चालीसा संदर्भातील प्रक्षोभक भाषणाचा मोठा परिणाम महाराष्ट्रात झाला हे खरेच. यातून समोर आले ते लोकांचे धर्मविषयक, देव विषयक अज्ञान आणि मुस्लिम विषयक द्वेष. या असल्या फाजूल मुद्याला किती महत्व द्यायचे याचे ‘बाळ’कडू आपल्या माध्यमांना नाही. किंबहुना संघ- भाजपचे एकतारी तुणतुणे वाजवणे, हा ‘माध्यमीधर्म’ भारतीय माध्यम व्यवस्था चोखपणे बजावत आहे. या माध्यम व्यवस्थेच्या तुणतुण्याची तार लोकशाहीचा सूर सोडून तिसरीकडेच वाजते. त्यामुळे राज्यातील वातावरण तापले. राज्यात सर्वच नेते मंडळी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत याच मुद्याच्या कक्षेत बोलत होते. हे महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडत आहे असे अजिबात नाही. महाराष्ट्रासह देशात राजकारण करणारांचा पाया हा देव, धर्म- जात आणि पाकिस्थान हा आहे. महाराष्ट्रात मराठी माणूस, मराठी पाट्या, परप्रांतीय, हिंदुत्व, पुरोगामीत्व आणि उरली सुरली हनुमान चालीसा आणि भोंगा. हे राजकारणाचे मुद्दे महाराष्ट्राचा काय विकास करणार आहेत. राज ठाकरे यांचा ३ तारखेचा अल्टामेन्ट पोलीस कारवाईमुळे गुंडाळला हे खरेच पण असले धार्मिक तेढ निर्माण करणारे राजकारण केव्हा गुंडाळले जाणार आहे?
मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंच्या भाषणाचे व मशिदीवरील भोंग्याचे पडसाद अजूनही राज्याच्या राजकारणात उमटताना दिसत आहेत. राज ठाकरेच्या बदलेल्या भूमिकेवरून व त्यांनी मांडलेल्या मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसेतील मुस्लिम पदाधिकारी यांनी पक्ष सोडला आहे. याचे महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर देखील भोंग्याचे पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्रासोबत उत्तर प्रदेशमध्ये देखील अजान भोंग्यावर होत असल्यामुळे हनुमान चालीसा देखील भोंगावर पठण करण्यात आली. या सर्व घडामोडीनंतर पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकले आहे. मनसेचे नेते महेंद्र भानुशाली यांना पोलिसांनी घेतले ताब्यात घेतले आहे. मुंबईत सर्वप्रथम त्यांनी भोंगे लावले होते. पोलिसांनी कारवाई दरम्यान त्यांच्याकडील काही भोंगे घेतले ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी मनसे सैनिकांना ताब्यात घेण्याची सुरूवात केली आहे. राज ठाकरे यांना कोर्टाने समन्स काढले, पोलिसात गुन्हा नोंद झाला हे जरी खरे असले तरी राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल होणार का? हाच खरा प्रश्न आहे. राज ठाकरे यांना यापूर्वी एकदा पोलिसांनी रात्री 02:45 वाजता अटक केली होती. ते ही थेट रत्नागिरीच्या गेस्ट हाऊसवरून. विषय होता रेल्वे पदभरती मध्ये मराठी विध्यार्थ्यांना डावलल्याचा. दरम्यान मनसे कार्यकर्त्यांनी परप्रांतीय विध्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात जाऊन मारहाण केली होती. तेव्हा राज ठाकरेंवर कारवाई करण्याचा मागणीने जोर धरला होता. दरम्यान कधीही काहीही होऊ शकतं अशी परिस्थिती निर्माण झाली होती. कोर्टाने आदेश काढला. राज ठाकरे यांना अटक वॉरंट निघालं. अन् राज ठाकरेना रात्री 02:45 वाजता मुंबई पोलिसांनी रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहातून अटक केली. सुनावणी दरम्यान राज ठाकरेंना 14 दिवसांची न्यायालयीन कस्टडी देण्यात आली होती. परंतु काही क्षणात एक बातमी समोर आली, ती बातमी होती राज यांच्या सुटकेची. न्यायालयीन कस्टडी मिळाल्यानंतरही राज यांना जामीन मंजूर झाला होता. भोंगा आणि हनुमान चालीसा प्रकरणातही राज ठाकरे यांना कोर्टाने नोटीस काढली. औरंगाबाद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मनसेचे नेते महेंद्र भानुशाली यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी मनसे सैनिकांना ताब्यात घेण्याची सुरूवात केली आहे. पण पोलिसांनी हे करण्यासाठी एवढा उशीर का केला? पोलीस राज ठाकरे यांना अटक करणार आहेत का? एवढे नक्की आहे की, पोलिसांना हे उशिरा सुचलेलं शहाणपण.  

COMMENTS