मध्यावधी निवडणुकीसाठी ‘ईडी’ची भीती ; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मध्यावधी निवडणुकीसाठी ‘ईडी’ची भीती ; संजय राऊत यांचा गौप्यस्फोट

सहकार्य करा, अन्यथा तुरुंगात टाकण्याची धमकी

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळत नसल्यामुळे काही लोकांकडून मध्यावधी निवडणुका घेण्याचा घाट घातला जात असून, मध्यावधी निवडणुकीसाठी

मानवी तस्करीत अडकलेल्या पीडितांच्या पुनर्वसनासाठी वकिलांची भूमिका महत्वाची l LokNews24
पुण्यात पोलीसांच्या नाकावर टिच्चून गुंडागर्दी | LOKNews24
अभिनेता साहिल खान याला अटक

मुंबई/प्रतिनिधी : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळत नसल्यामुळे काही लोकांकडून मध्यावधी निवडणुका घेण्याचा घाट घातला जात असून, मध्यावधी निवडणुकीसाठी सहकार्य न केल्यास तुरुंगात टाकू, अशी धमकी देण्यात आल्याचा गौप्यस्फोट शिवसेना नेते संजय राऊत यांनी बुधवारी केला.
ईडीच्या माध्यमातून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करत, संजय राऊत यांनी यासंदर्भातील तक्रार थेट उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. या पत्रात राऊत म्हणतात, संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे की, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा विरोधक प्रयत्न करत आहेत. काही लोक माझ्याकडे आले होते. त्यांनी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांचे सरकार अस्थिर करण्यास सांगितले. मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी हा प्रयत्न सुरु होता;पण मी याला नकार दिला. यावेळी त्यांनी मला इशारा दिला की, राज्यात मध्यावधी निवडणूक होण्यासाठी मदत केली नाही तर माझी अवस्था माजी रेल्वेमत्री लालूप्रसाद यादव यांच्यासारखी होईल. मला धमकी देण्यात आली होती की, महाराष्ट्रातील दोन मंत्री हे विदेशी संपत्ती नियमन कायदा ‘पीएमएलए’नुसार अटक केली जाईल. माझ्या कुटुंबीयांकडे अलीबागमध्ये 17 वर्षांपूर्वी खरेदी केलेली एक एकर जमीन आहे. आता ईडी म्हणतं आहे की, जमीन किंमतीपेक्षा बाजारामुल्यांपेक्षा अधिक आहे. 2012-13मध्ये मी ज्यांना माझी जमीन विकली त्यांनाही तपास यंत्रणा जाणीवपूर्वक फोन करुन तुरुंगात पाठविण्याची धमकी देत आहेत. आतापर्यंत 28 जणांवर चुकीची कारवाई करण्यात आलेली असून, माझ्यावर दबाव आणत जबाब देण्यास सांगितल्याचेही राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे.

मुलीच्या लग्नानंतर डेकोरेटर्संना ’ईडी’कडून धमक्या
माझ्या मुलीचा विवाह 29 नोव्हेंबर 2021 रोजी झाला. ईडी आणि इतर तपास संस्था मंडप डेकोरेटर्स व इतर व्हेंडर्सना बोलावून 50 लाख रुपये रोख मिळाल्याचे सांगा असे म्हणत आहेत. या लोकांनी नकार दिल्यानंतरही ईडी व इतर तपास संस्थांचे लोक त्यांचा सातत्याने छळ करत आहेत. ईडी व इतर तपास संस्थांनी आतापर्यंत 28 लोकांना बेकायदेशीरपणे निवडले आहे. त्यांना ईडी ऑफिसात बोलावून, केबिनमध्ये बसवून धमकावले जात असल्याचा आरोप राऊत यांनी केला.

फडणवीसांना दिले आव्हान
ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन दोन चार लोक जाऊन बसतात आणि सूचना आणि आदेश देतात. मी देवेंद्र फडणवीसांना आवाहन करत आहे आणि त्यांना माहिती आहे मला काय सांगायचे आहे. सरकार पाडण्यासाठी यानंतरही प्रयत्न होतील पण हे पडणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कुटुंबालाही खोटे पुरावे तयार करुन त्रास दिला जात आहे. रोज सकाळी एक माणूस उठतो आणि बेवड्यासारखा बडबडतो आणि त्यावरुन ईडी कारवाई करते. आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिला.

सिंह गिधाडाच्या धमकीला घाबरत नाही : फडणवीस
शिवसेनेचे नेते संजय राऊत हे रोज सकाळी बोलून सर्वांचे मनोरंजन करतात. त्यांच्या विधानांना फार महत्त्व देण्याची गरज नाही, असे स्पष्ट करत सिंह गिधाडाच्या धमकीला घाबरत नाही, असा पलटवार विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. गोवा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

COMMENTS