Homeताज्या बातम्यादेश

संसदेच्या हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरला सुरू होऊन ते 22 डिसेंबपर्यंत चालेल, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी द

पाटण नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी सौ. मंगल कांबळे बिनविरोध
अहमदनगरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मोठा राडा
पुणे विद्यापीठात वर्गणी न दिल्याने राडा

नवी दिल्ली : संसदेचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरला सुरू होऊन ते 22 डिसेंबपर्यंत चालेल, अशी माहिती संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी गुरुवारी दिली. अधिवेशन काळात 19 दिवसांत 15 सत्रे होतील, असे जोशी यांनी ‘एक्स’वरील पोस्टद्वारे सांगितले. ‘अमृतकाळात कायदेविषयक कामकाज आणि इतर मुद्दयांवर चर्चा होण्याची प्रतीक्षा आहे’, असे ते म्हणाले. तृणमूलच्या खासदार महुआ मोइत्रा यांच्याविरुद्ध ‘प्रश्‍न विचारण्यासाठी पैसा’ या आरोपांबाबत नैतिकता समितीचा अहवाल याच अधिवेशनात लोकसभेत मांडला जाणार आहे. समितीने केलेली बडतर्फीची शिफारस अमलात आणण्यापूर्वी सभागृहाला हा अहवाल मंजूर करावा लागणार आहे.

COMMENTS