Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाळू माफियाप्रमाणे लँडमाफियांना महसूलमंत्री लगाम घालणार का ?

खरेदी-विक्रीच्या व्यवहाराची चौकशी केल्यास अनेकांचे पितळ उघडे पडणार

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राज्याचे महसूलमंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी गौण खनिज तथा वाळू उपसा आणि वाळू वाहतुकीचे नवे

अब्दुल सत्तार भावणिक माणुस आहे  – राधाकृष्ण विखे पाटील
विकसित भारताचा संकल्पपूर्ण करणारी निवडणूक
मुळा, जायकवाडी प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी लागणार मार्गी !

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राज्याचे महसूलमंत्री आणि नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी गौण खनिज तथा वाळू उपसा आणि वाळू वाहतुकीचे नवे धोरण आणल्याने नगर जिल्ह्यातल्या वाळूमाफियांचे एक प्रकारे कंबरडे मोडले आहे. वाळू माफियांच्या अक्षरशः आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत. त्याच प्रमाणे जिल्ह्यात लँडमाफियांनी उच्छाद मांडला आहे. निबंधकांना हाथी धरुन बोगस खरेदी खताद्वारे खरेदी करुन अनेकांना वेठीस धरण्याचे पाप लँडमाफियांनी केले आहे. प्रत्येक तालुक्यातील निबंधकासह खरेदी विक्री चा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आणल्यास लँडमाफियांना लगाम बसेल महसुल मंत्री या नात्याने ना.विखे यांनी गौण खनिज बाबत टोकाचे पाऊल उचलले तसेच लँडमाफियांन बाबत परखड भुमिका घेतल्यास लँडमाफियांना बळी पडलेल्या नागरीकांना न्याय मिळेल.


वाळू माफीयांच्या आडून अधिकारीही गब्बर झाले होते.त् याच प्रमाणे लँडमाफियांचा असाच प्रकार असुन तलाठी, ग्रामसेवक, मुख्याधिकारी, सर्कल यांना हाताशी धरुन गेल्या पाच वर्षांत नगर जिल्ह्यात लँडमाफियांनी कित्येक संशयास्पद अशा जमीन, मोकळ्या जागेचे संबंधित जागा मालकाला अंधारात ठेवून संशयास्पद व्यवहार केलेले आहे. हे व्यवहार करत असताना लँडमाफियांनी संबंधित जागामालकाच्या वयाचा दुसरा डमी मालक उभा करुन त्याच्या नावाने बनावट आधारकार्ड तयार करुन घेतली आहेत. हे सर्व व्यवहार करताना खरेदी विक्रीच्या वेळी निबंधकाच्या कानावर घातलेले असल्याने अनेक निबंधक कार्यालयात इतरांचे खरेदी विक्री व्यवहार मागे ठेवून लँडमाफियांचे खरेदी विक्री व्यवहार अग्रक्रमांकाने करुन इतरांच्या निर्दशनास येण्यापुर्वी लँडमाफियांना कार्यालतातून जाण्यास सांगितले जाते. अधिकार्‍यांचा हिस्सा संध्याकाळी ठराविक ठिकाणी रंगित संगित पार्टी करुन दिला जातो. लँडमाफियांना सर्वसाधारणपणे आधारकार्ड तयार करायला शंभर ते दीडशे रुपये खर्च येतो. पण हे असे बनावट आधारकार्ड तयार करुन घेण्यासाठी संबंधितास मोठी रक्कम दिली जाते. विशेष म्हणजे बनावट आधारकार्ड तयार करुन देणारी एक नव्हे अनेक टोळ्या नगर जिल्ह्यात कार्यरत आहेत. या लोकांनी आतापर्यंत किती आणि कशी आधारकार्ड तयार करुन दिली, याचीही सखोल चौकशी करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे. जागेचे मूळ मालक कामानिमित्त बाहेरगावी किंवा परदेशात असतात.तसेच अडानी व गरीबीचा फायदा घेवून अशा जागा मालकांचा शोध घेऊन त्यांच्या जमिनीची आणि जागेची खोटी कागदपत्रं तयार करण्याचं कामं ही टोळी करते आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे एका जागेचे किंवा जमिनीचे अनेकवेळा व्यवहार झालेले आहेत. तसे गुन्हेदेखील नगर जिल्ह्यातल्या अनेक पोलिस ठाण्यात दाखल आहेत.

जिल्ह्यात अनेक वर्षांपासून जमीन खरेदी-विक्रीचा गोरखधंदा सुरू – ना. विखे यांनी गेल्या पाच वर्षांतले जरी असे खरेदी-विक्रीचे व्यवहार तपासले तर या भ्रष्टाचाराच्या मुळापर्यंत सरकारला जाता येईल. जागा किंवा जमिनीची बनावट कागदपत्र तयार करुन एवढ्यावरच या टोळ्या थांबत नाहीत. तर मूळ जागा मालकांच्याच वयाची व्यक्ती शोधून त्या व्यक्तीच्या नावानं सर्व बनावट कागदपत्रं तयार केली जातात आणि मूळ मालकाच्या जागी त्याच्या दुसर्याच व्यक्तीला जागेचा मूळ मालक दाखविण्यात येवून खरेदी विक्रीचा व्यवहार पुर्ण केला जातो. नगर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून हा गोरखधंदा सुरु आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी ज्यांचे खायचे वांदे होते, ज्यांना रहायला कच्च घर नव्हतं, या गोरखधंद्याच्या आधारे त्या लोकांनी  करोडो रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जमविली आहे. नामांकित कंपन्यांची चार चाकी वाहनं आणि सरकारी परवाना असलेलं पिस्तूल घेऊन ही मंडळी सर्वसामान्यांवर दहशत निर्माण करत आहेत.

COMMENTS