नव्या अध्यक्षांना अधिकार मिळतील का ?

Homeताज्या बातम्यासंपादकीय

नव्या अध्यक्षांना अधिकार मिळतील का ?

काँगे्रसची हायकमांड संस्कृती संपूर्ण देशाने पाहिली आहे. अशावेळी काँगे्रसची अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. खरगे भलेही अध्यक्ष होतील, मात्र कारभार ते हा

राजकारणातील गुन्हेगारीकरण
वंचित ‘मविआ’ला बळ देणार का ?
एक देश, एक निवडणुकीवर प्रश्‍नचिन्ह

काँगे्रसची हायकमांड संस्कृती संपूर्ण देशाने पाहिली आहे. अशावेळी काँगे्रसची अध्यक्षपदाची निवडणूक होत आहे. खरगे भलेही अध्यक्ष होतील, मात्र कारभार ते हाकतील की, गांधी परिवार हा कळीचा मुद्दा आहे. काँग्रेस पक्षाला उर्जितअवस्था येण्यासाठी पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वात बदल करण्याची गरज असल्याचे मतमतांतरे पहावयास मिळत होती. काँग्रेसचे खा. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद न स्वीकारण्याची भूमिका घेतल्यामुळे ही निवडणूक घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अखेर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी अध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यासाठी मान्यता दिली. त्यानुसार 17 ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया होत आहे. निवडणूकीच्या रिंगणात मल्लिकार्जून खर्गे आणि शशी थरूर हे दोन नेते निवडणुकीच्या रिंगणात उतरले. काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष पध्दतीने पार पडायला हवी, असे घोषणा करण्यात आली. त्याचदरम्यान आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामध्ये काँग्रेसचे नेते गौरव वल्लभ, दीपेंद्र हुड्डा आणि सय्यद नसीर हुसेन यांनी मल्लिकार्जून खर्गे अध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रविवारी प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला. यामुळे मल्लिकार्जून खर्गे यांच्या पाठीमागे तीन प्रवक्ते उभे राहिल्याने खर्गे यांचे पारडे जड होण्यास सुरु झाले आहे. तसेच खर्गे यांच्यासाठी प्रचार करणार आहोत. ते निवडून यावेत, यासाठी काम करणार आहोत, अशा भावना या तीन नेत्यांनी व्यक्त केल्या. काँग्रेस पक्षाला बळकट करण्यासाठी मी या निवडणुकीत उतरलो आहे. कोणालाही विरोध करण्याचा माझा उद्देश नसल्याचे सांगत गांधी परिवाराचे मला समर्थन असल्याचे नवी दिल्ली येथे माध्यमांशी ते बोलताना खर्गे यांनी सांगितले. तसेच भाजपचे सरकार केंद्रात आल्यापासून देशातील सामाजिक समलोत बिघडवला जात आहे. बेरोजगारी, महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे श्रीमंत लोक वरचेवर श्रीमंत होत आहेत. तसेच गरीब मात्र गरीबच होत चालले आहेत. जनतेच्या हिताच्या दृष्टीने भाजप सरकार काहीही काम करत नसल्याचेही टीकास्त्र खर्गे यांनी स्पष्ट केले. काँग्रेसला पार्ट टाइम नव्हे, तर फुल्ल टाइम अध्यक्षाची गरज आहे. अशोक गेहलोत जर एकाच वेळी काँग्रेस अध्यक्ष आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री पदावर राहिले तर आमचा विरोध राहील. आम्ही कधीच एका कुटुंबाच्या विरोधात नव्हतो. पण, जो कोणी अध्यक्ष होईल तो निवडणुकीच्या माध्यमातून व्हावा. राहुल गांधींना आजही निवडणूक लढवायची असेल आणि त्यांनी फॉर्म भरला तर आम्ही त्यांचे स्वागत करू. तसेच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि खा. शशी थरूर यांच्यात थेट लढत होणार अशी शक्यता असल्याचे वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जी-23 गटातील नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुखमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे काँग्रेस अध्यक्ष पदासाठी काय सुरु आहे. हे जाणून घेण्याबाबत जनतेमध्ये उत्कंटता वाढत चालली आहे. अध्यक्ष बदलातून काँग्रेसला गत वैभव प्राप्त व्हावे ही इच्छा जरी असली तरी भाजप सारख्या पक्षाने चुण-चुणकर लक्ष्य करण्याच्या कृत्यामुळे काँग्रेसचे नेते हतबल झाले असल्याचेही पहावयास मिळत आहेत. त्यामुळे देशांतर्गत सुरक्षा व देशांर्तगत व्यवहार यावरही या बदलाचा परिणाम होणार आहे. त्यामुळे विरोधकांकडून घराणेशाहीचा आरोप काँग्रेसवर केला जात होता, त्यावर कोठेतरी अंकुश ठेवता येईल, हे यातून स्पष्ट होत आहे. पदासाठी सर्वच पक्षात चुरस असते हे सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्रात तर आख्खा पक्षच आमचा आहे, असे म्हणून पक्षाच्या प्रमुख व्यक्तीला न्यायालयात खेचण्यास मागे-पुढे लोक पाहत नसल्याचे उदाहरण आता सध्या चर्चेत आहे. त्यामुळे पक्ष व पक्ष चिन्ह यांच्यावर कोणी फुटीर गटाने दावा करू नये म्हणून निवडणूका ह्या शांततेच्या मार्गाने चुरशीने व्हायला पाहिजे, हे लोकशाही जिवंत असल्याचे लक्षण आहे.

COMMENTS