Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ऐन रमजानमध्ये घरखर्चास पैसे न दिल्याने पत्नीचे पतीवर चाकूने वार

पुणे : घरखर्चास पैसे न दिल्यामुळे पत्नीने पतीवर चाकून वार केल्याची घटना पुण्यातल्या कोंढवा परिसरात घडली आहे. इम्रान खान (वय 46) असे जखमी पतीचे ना

पोलिसांना मारहाण व गोंधळ घातल्याप्रकरणी सहा जणांविरूद्ध गुन्हा
Jalna : ३६ तासात दोन दरोडेखोरांना पकडण्यात पोलिसांना यश (Video)
खुनाच्या प्रयत्नाबद्दल एकास सक्तमजुरीची शिक्षा

पुणे : घरखर्चास पैसे न दिल्यामुळे पत्नीने पतीवर चाकून वार केल्याची घटना पुण्यातल्या कोंढवा परिसरात घडली आहे. इम्रान खान (वय 46) असे जखमी पतीचे नाव असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. इम्रानची पत्नी नाझनीन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मात्र, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. इम्रान आणि नाझनीन यांच्यात नेहमी खटके उडायचे. सध्या इस्लाम धर्मियांचा पवित्र असा रमजान महिना सुरू आहे. रमजानचे उपवास सुरू आहेत. त्यामुळे नाझनीनला घरखर्चासाठी काही पैसे हवे होते. तिने इम्रानला ते मागितले. मात्र, त्याने पैसे दिले नाहीत. त्यावरून पुन्हा इम्रान आणि नाझनीनमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यातून तिने इम्रानवर स्वयंपाक घरातील चाकूने वार केले. सध्या इम्रानवर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. दरम्यान, क्षुल्लक कारणावरून अनेकदा पती आणि पत्नीमध्ये वाद होतात. या वेळी रागावर थोडे नियंत्रण ठेवले अथवा कोणीतरी एकाने माघार घेतली, तर असे टोकाचे प्रसंग सहज टाळता येतात. मात्र, छोट्या-छोट्या घटनतून हिंसेच्या प्रकारात वाढ झाल्याचे समोर येत आहे.

COMMENTS