खुनाच्या प्रयत्नाबद्दल एकास सक्तमजुरीची शिक्षा

Homeताज्या बातम्याअहमदनगर

खुनाच्या प्रयत्नाबद्दल एकास सक्तमजुरीची शिक्षा

अहमदनगर/ जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस दोषी धरून सक्तमजुरीची शिक्षा येथील जिल्हा न्यायाधीश श्रीमती एम. ए. बरालिया यांनी ठोठावली

शेत जमीन व्यवहार फसवणुक प्रकरणी महेश संचेतीवर कोतवालीतही गुन्हा दाखल
अहमदनगर : केडगावमध्ये ११ लाखांची सुगंधी सुपारी जप्त
नगर अर्बन बँकेच्या कर्जखात्यांचे फॉरेन्सिक ऑडीट

अहमदनगर/

जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपीस दोषी धरून सक्तमजुरीची शिक्षा येथील जिल्हा न्यायाधीश श्रीमती एम. ए. बरालिया यांनी ठोठावली आहे. शिक्षा झालेल्या या आरोपीचे नाव कालीदास बाबासाहेब बोडखे (वय 26, पारगाव वाळुंज, ता. नगर) आहे. तब्बल 23 वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आहे.

याबाबतची माहिती अशी की, दि. 29/05/1998 रोजी सकाळी सुमारास फिर्यादी मीना भिवसेन घुले व तिचे पती भिवसेन घुले हे त्यांच्या मृत मुलीचा मुलगा (नातु) रूद्र यास भेटण्यासाठी मौजे वाळुंज पारगाव, ता. नगर येथे गेले. त्यावेळी ते त्यांच्या नातवाला, तू आमच्या बरोबर चल असे म्हणाले असता आरोपी कालीदास बोडखे याला राग आल्याने त्याने फिर्यादी व तिच्या पतीस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी फिर्यादीचे मेव्हणे मच्छिंद्र घुले हे आरोपीच्या घरासमोरून जात असताना त्यांनी फिर्यादी व आरोपी यांच्यातील वाद चाललेला पाहून तेथे आले व त्यांनी फिर्यादी व आरोपी यांच्यातील वाद सोडविला. त्यानंतर फिर्यादी व तिचे पती हे घरी जाण्यासाठी मोटारसायकलवरून निघाले असता आरोपी कालीदास याने भिवसेन घुले व मच्छिंद्र घुले यांच्या डोक्यात लोखंडी फावडे मारून गंभीर जखमी केले. या प्रकरणी फिर्यादीने नगर तालुका पोलीस स्टेशन फिर्याद दाखल केली. या गुन्हयाचा तपास पोलिस उपनिरीक्षक एम. के. क्षीरसागर यांनी करून आरोपीविरूध्द न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेला साक्षी पुरावा व अतिरिक्त सरकारी वकील अनिल डि. सरोदे यांनी केलेला युक्तिवाद ग्राहय धरून न्यायालयाने आरोपी कालीदास बाबासाहेब बोडखे यास शिक्षा सुनावली.

COMMENTS