लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार : मुख्यमंत्री शिंदे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार : मुख्यमंत्री शिंदे

नवी दिल्ली/प्रतिनिधी : राज्यात गेल्या 23 दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी होईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र शनिवारी सुद्धा मंत

जागतिक अपंग दिनी सामाजिक कार्यकर्ते यांचा जनआक्रोश आंदोलन | LOKNews24
पुणेवाडी येथे माजी विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न 
भांडवलदारांची घसरलेली संपत्ती आणि वास्तव !

नवी दिल्ली/प्रतिनिधी : राज्यात गेल्या 23 दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी होईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र शनिवारी सुद्धा मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी सायंकाळी दिल्लीत दाखल झाले होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत चर्चा होऊन मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तूर्तास हा मंत्रिमंडळ विस्तार लवकर होईल अशी अपेक्षा नाही. यासंदर्भात बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राष्ट्रपती कोविंद यांना निरोप देण्यासाठी स्नेहभोजन ठेवण्यात आले होते. त्यासाठी आम्ही दिल्लीत गेलो होतो. तो स्नेहभोजनाचा कार्यक्रम असल्यामुळे तेथे बैठक चर्चा झाली नाही. लवकरच मंत्रीमंडळ विस्तार होईल त्याबाबत शंका बाळगण्याचं कारण नाही, असंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. राज्यातील कामांना दिलेल्या स्थगितीवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, संभाजी महाराजांच्या कामाला स्थगिती देण्यात आलेली नाही. आम्ही राज्यपालांना पत्र दिल्यानंतर अल्पमतात असणार्‍या सरकारने घाईगडबडीत 400 जीआर काढले. त्याला आम्ही स्थगिती दिली आहे. विकास कामांना राज्य सरकार कोणतीही स्थगिती देणार नाही. घाईत घेतलेल्या निर्णयांना स्थगिती आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला स्थगितीचा कोणताही विषयच येत नाही. ते आमचे आराध्य दैवत आहे. त्यात शासन कुठेही मागे राहणार नाही, असे शिंदे यांनी सांगितले.

शिंदे-शहा भेटीने मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग सुकर
केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा झाली असून, मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणतीही अडचण राहिलेली नाही. विधिमंडळ अधिवेशनापूर्वीच हा निर्णय घेतला जाईल. मंत्र्यांची यादी मात्र मुंबईत गेल्यावर निश्‍चित करू, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवसांमध्ये शिंदे गट-भाजप युतीचे व्यापक मंत्रिमंडळ स्थापन होऊ शकेल. शिंदे गट आणि भाजप यांच्या अनुक्रमे 14 व 25 मंत्र्यांचा समावेश केला जाईल, असे सांगितले जाते.

COMMENTS