Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हडपसरच्या वडाला सातार्‍यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान

सह्याद्री देवराईचा 14 रोजी राष्ट्रीय वृक्ष वडा सोबत व्हॅलेंटाईन डेसातारा / प्रतिनिधी : सुमारे शंभर वर्ष वयाच्या, पण मालकाला नकोशा झाल्याने कुर्‍हाड क

सातारा जिल्ह्यात निवडणूकीचे वारे; जिल्हा बँकेच्या निमित्ताने व्ह्यूरचनेस प्रारंभ
पावसाळ्यापूर्वी कास तलावाच्या सांडव्याचे काम पूर्ण
महाराष्ट्र राज्य साखर संघाच्या अध्यक्ष पदी पी. आर. पाटील

सह्याद्री देवराईचा 14 रोजी राष्ट्रीय वृक्ष वडा सोबत व्हॅलेंटाईन डे
सातारा / प्रतिनिधी : सुमारे शंभर वर्ष वयाच्या, पण मालकाला नकोशा झाल्याने कुर्‍हाड कोसळलेल्या हडपसरच्या वडाला सातार्‍यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात अभिनेते सयाजी शिंदे यांच्या ’सह्याद्री देवराई’ संस्थेला यश आले आहे. वृक्षांचे मानवतेशी असलेले श्‍वासाचे नाते चिरंतन रहावे, म्हणून सोमवार, दि. 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 ते 6 या वेळेत म्हसवे (डी मार्ट जवळ, ता. सातारा) येथे या वटवृक्ष सोबत अनोखा ’व्हलेंटाईन डे ’ साजरा करण्यात येणार आहे.
याबाबत अधिक माहिती देताना अभिनेते आणि सहयाद्री देवराई संस्थेचे संस्थापक सयाजी शिंदे म्हणाले, अडचण होत आहे असे समजून वड कापायला निघालेल्या हडपसरच्या एका व्यक्तीकडून आम्ही शंभर वर्ष वयाचा हा वटवृक्ष शास्त्रोक्त पध्दतीने पुनर्रोपणासाठी हलवला. लांब ट्रकमधून सातार्‍याला गोळीबार मैदान, म्हसवे येथे नेवून पुनर्रोपण केले. त्याला जीवदान मिळून पालवी फुटली आहे. व्हलेंटाईन डे ला आम्ही सर्व वृक्षप्रेमी नागरिक, विद्यार्थी या पालवी फुटलेल्या वटवृक्षा भोवती जमून त्याचे गोडकौतुक करणार आहोत.
शंभर वर्षाचे झाड पुनरुज्जीवन करायला फक्त 25 हजार खर्च आला. अडचण होते, म्हणून ही झाडे काढून टाकून देता कामा नये. हा तर राष्ट्रीय वृक्ष आहे. त्याचे सन्मानाने 26 जानेवारी रोजी म्हसवे (सातारा) येथे पुनर्रोपण करण्यात आले. निवडणुकीत जिंकला तरी एखाद्याची आपण मिरवणूक काढतो. इथे तर शंभर वर्षाचा राष्ट्रीय वृक्ष वाचला आहे. म्हणून त्याच्या पालवी सोबत गाणी गायली जाणार आहेत. नृत्य केले जाणार आहे, असे सयाजी शिंदे यांनी सांगितले.
संस्थेचे विश्‍वस्त धनंजय शेडबाळे म्हणाले, वडासारख्या मोठ्या झाडांना वाचवता येते, जीवदान देता येते, हा संदेश देण्यासाठी हा उपक्रम आम्ही व्हॅलेंटाईन डे दिवशी करत आहोत. पानसरे नर्सरी (श्रीगोंदा) चे संचालक बाळासाहेब पानसरे यांनी या वटवृक्षाच्या पुनर्रोपणाच्या सर्व प्रक्रियेचे व्यवस्थापन केले. 14 फेबुवारी रोजी या कार्यक्रमात पुनर्रोपणाच्या तंत्राची माहिती देणार आहेत.
आतापर्यंत साधारण 22 देवराई, 1 वृक्ष बँक, 14 गड किल्ल्या सोबत राज्यभरात अनेक ठिकाणी किमान 4 लाखापेक्षा अधिक वृक्षारोपण करणार्‍या सयाजी शिंदे यांच्या सह्याद्री देवराई या संस्थेने वृक्षारोपणाचा ध्यास घेतला आहे.
सातार्‍यातही अभिनेते सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून दुर्मिळ झाडांचे उद्यान तयार केले जात आहे. उद्यानात ते मेहनत घेताना अनेकदा दिसून येतात. सह्याद्रीच्या पर्वत रांगामधील पश्‍चिम घाटामध्ये असणार्‍या दुर्मिळ वनस्पती आणि वृक्ष त्याबरोबर देशातील इतर राज्यातील 600 हून अधिक असलेल्या दुर्मिळ वृक्षांच्या प्रजाती एकाच ठिकाणी लावण्याचा अनोखा प्रयोग सातार्‍यात सुरू करण्यात आला. पुणे-बंगळुरु महामार्गालगत सातार्‍यातील म्हसवे गावाच्या बाजूला हा उपक्रम राबवण्यात येत आहे. महामार्गाजवळील पोलीस गोळीबार मैदानाच्या तब्बल 30 एकर जागेत सह्याद्री देवराई, पोलीस प्रशासन आणि वनविभाग यांच्यावतीने हे अनोखे उद्यान उभारण्यात येत आहे.

COMMENTS