Homeमनोरंजनलाईफस्टाईल

तारुण्यपण टिकवून ठेवण्यासाठी बदामाचा असा करा उपयोग

तारुण्यपण टिकवून ठेवण्यासाठी बदामाचा असा करा उपयोग

.तारुण्यपण टिकवून ठेवण्यासाठी बदामाचा करा उपयोग बदामात जीवनसत्त्व ई भरपूर प्रमाणात असते बदामाचा फेस पॅक आपण लावू शकतो मसूरच्या डाळीत बदामाची पेस्ट कर

सह्याद्री खरेदी-विक्री संघ खत कारखाना उभारणार : सत्यजित देशमुख
Pune : पुण्यातील मराठी अभिनेत्रीचा गोव्यात मृत्यू (Video)
आरआरआर फेम अभिनेते रे स्टीवेन्सन यांचे निधन

.तारुण्यपण टिकवून ठेवण्यासाठी बदामाचा करा उपयोग बदामात जीवनसत्त्व ई भरपूर प्रमाणात असते बदामाचा फेस पॅक आपण लावू शकतो मसूरच्या डाळीत बदामाची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावणे बदामाच्या पावडरमध्ये केसर मिक्स करुन त्वचेला लावणे बदमामुळे डाग घालवण्यास मदत होते बदामाच्या तेलाने डार्क सर्कल्स कमी होण्यास मदत होते. बदामाचे तेल हे नॅचरल सनस्क्रीन म्हणून काम करते.

आपल्या सगळ्यांना असे वाटत असते की , आपली त्वचा नेहमी तरुण राहावे . जस जसे आपले वय वाढते तस तसे आपले बारीक रेषा किंवा सुरकुत्या स्पष्टपणे दिसू लागतात.
सुंदर दिसणे कोणाला आवडत नाही . त्यासाठी आपण अनेक सौंदर्य प्रसाधनांचा वापर करत असतो . वाढत्या वयानुसार आपल्या त्वचेवर अनेक बदल दिसून येतात . बदलत्या ऋतूमानानुसार आपली त्वचा कोरडी किंवा तेलकट होऊ लागते. आपले तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी आपण बदामाचा वापर करु शकतो . बदामात जीवनसत्त्व ई भरपूर प्रमाणात असते त्यामुळे उन्हाळ्यात देखील त्याचे संरक्षण होते. तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी बदामाचा वापर कसा करायचा हे जाणून घ्या.

१. बदामाचा फेस पॅक आपण लावू शकतो. मसूरच्या डाळीत बदामाची पेस्ट करुन चेहऱ्यावर लावू शकतो. यामुळे तरुण बनण्याबरोबरच मृत त्वचेच्या पेशी देखील निघून जाण्यास मदत होते.


२. आपल्या त्वचेचा रंग सुधारण्यासाठी आपण बदामाच्या पावडरमध्ये केसर मिक्स करुन त्वचेला लावू शकतो. यात आपण कच्चे दुध देखील घालावे व काही मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा.

३. चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी आणि त्याचा पोत सुधारण्यासाठी बदाम फार उपयुक्त आहे. यामुळे त्वचेला पोषण मिळते व त्वचा अधिक मुलायम बनते. त्वचेला मॉइश्चरायजर करुन डाग घालवण्यास मदत करते.

४. रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाने डोळ्याखालील असणाऱ्या काळ्या वर्तुळाजवळ मालीश केल्यास फायदा होईल. असे रोज केल्यास डार्क सर्कल्स कमी होतील.

५. बदामाचे तेल हे नॅचरल सनस्क्रीन म्हणून काम करते. त्वचेचे उन्हापासून संरक्षण करते व तसेच सूर्याच्या वाईट किरणांना लांब ठेवते.

COMMENTS