Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदपूर बाजार समितीवर महाविकास आघाडीने मारली बाजी

अहमदपूर प्रतिनिधी - अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने 13 जागा मिळवित आपले वर्चस्व निर्माण केले आहे. निकाल जाहीर होत

सासू-सुनेचा विजेच्या धक्क्याने मृत्यूू
आयुष्याचे वास्तव चित्रण म्हणजे गझल -प्रसिद्ध गझलकार अरविंद सगर
रेल्वेत चोर्‍या करणारा जेरबंद

अहमदपूर प्रतिनिधी – अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने 13 जागा मिळवित आपले वर्चस्व निर्माण केले आहे. निकाल जाहीर होताच महाविकास आघाडी कार्यकर्त्यनी गुलालाची उधळणकरीत, फटाक्याची आतिषबाजी करुन आनंदोत्सव साजरा केला. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर आमदार बाबासाहेब पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे.
सोसायटी मतदारसंघ- मंचकराव मोहनराव पाटील 506, किशन ईश्वरराव पाटील, 444, बालाजी पुडंलिक कातकडे 436, रामदास गोंविद कदम, 467, सतिश प्रताप नवट्टके, 464, संतोष प्रभूप्पा रोडगे, 421, संजय तुकाराम पवार, 447 सोसायटी माहिला मतदार संघ-कैवल्या संतोष नागमोडे, 505, इंदूताई माधव पवार 466, सोसायटीओबीसी-चंद्रकांत पंढरीनाथ मद्दे 453, सोसायटी भटक्या विमुक्त जाती-यशवंत दत्तू केंदे, 502, ग्रामपंचायत सर्वसाधरण गट-शिवाजी सुभाषराव पाटील, 402 ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल गट- शिवाजी नरिंसग खांडेकर 420 हे सर्व महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार आहेत.भाजप,काँग्रेस, शिवसेना शिंदे गटाचे एकूण पाच उमेदवार विजयी झाले आहेत यातग्रामपंचायत सर्वसाधरणगट- जिवनकूमार रामराव म6ेवाड, 416, ग्रामपंचायत अनुसुचित गट -अण्णासाहेब रामकिशन कांबळे, 426, व्यापारी मतदारसंघ- धनराज भगवाराव पाटील, 148, विलास दयासागर शेटे 169, हमाल / तोलारी मतदारसंघ- मुस्तफा इब्राहिम सय्यद 105 हे विजयी झाले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत सोसायटी एकूण मतदान 890 मतदान असून त्यापैकी 881 मतदान झाले. ग्रामपंचायत मतदारसंघात मतदान 858 मतदार असून 848 मतदान झाले. व्यापारी मतदारसंघात एकूण 263 मतदानापैकी 254 मतदान झाले आहे.

COMMENTS