Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

’वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ जीवनात हवीत ः कल्पनाताई वाघुंडे

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः संत तुकारामांनी 17व्या शतकात वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे-पक्षीये सुस्वरें आळविती हा जीवनदायी संदेश आजही गरजेचा आहे,  प्रा

अगोदर सुविधा द्या, मगच वसुलीची मोहीम राबवा
व्यावसायिकाने पत्नीची हत्या करून केली आत्महत्या
बेलापूरातील सीसीटीव्हीमुळे गुन्हेगारीला वचक

श्रीरामपूर/प्रतिनिधी ः संत तुकारामांनी 17व्या शतकात वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे-पक्षीये सुस्वरें आळविती हा जीवनदायी संदेश आजही गरजेचा आहे,  प्राणवायू देणारी झाडे आणि पशूपक्षी हीच आपली दैवते मानून पर्यावरण रक्षण आणि संवर्धन केले पाहिजे,देतो तो देव हा आदर्श जपला पाहिजे असे विचार माऊली वृद्धाश्रमाच्या प्रमुख कल्पनाताई वाघुंडे यांनी व्यक्त केले.
  येथील विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे माऊली वृद्धाश्रमात आंबे वाटप, पुस्तके प्रदान आणि झाडे लावा, झाडे जगवा उपक्रम आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी सौ.कल्पनाताई वाघुंडे बोलत होत्या, प्रथम श्रीविठ्ठल रुक्मिणीपूजन झाले.विश्‍वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानचे संस्थापक, सचिव सुखदेव सुकळे यांनी 2018पासून प्रतिष्ठानचे उपक्रम सांगून स्वागत, प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. शन्करराव गागरे यांनी स्वाध्याय परिवार आणि सेवाभाव यांचे महत्व सांगून वृद्धाश्रमात  पर्यावरणपूर्वक उपक्रमाबद्दल कौतुक केले.साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी उपक्रमाचे कौतुक करून आज उन्हाळा तीव्र झाला असून आपण निसर्गाकडे दुर्लक्ष केले आहे, प्राणीहत्या आणि वृक्षहत्या ह मानवजीवनाला घातक आहे. अशी हत्या करणार्‍यांना अशीच शिक्षा असली तरच पर्यावरण टिकेल.नको त्या माध्यमचर्चा टाळून जीवनदायी बातम्या, चर्चा झाल्या पाहिजेत असे डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी सांगून पुस्तकवाचन वाढण्यासाठी सर्वांना पुस्तके देऊन सन्मान केले.सौ. कल्पनाताई वाघुंडे पुढे म्हणाल्या, माऊली वृद्धाश्रमातील ज्येेष्ठ नागरिकांना पत्र्याच्या शेडमध्ये राहवे लागते, प्रचंड उन्हाळा आणि अडचणी आहेत.सुकळेसर 2018पासून त्यांच्या झाडांची केशर आंबे देतात, भेटवस्तू देतात, त्यांचे मोठे योगदान आहे. स्व. पुष्पाताई सुकळे यांच्या आठवणी सांगितल्या. सर्वत्र झाडे लावली जात आहेत, त्यामुळे पक्षी आनंदाने राहतात असे सांगून डॉ. उपाध्ये व मंदाकिनी उपाध्ये यांच्या विवाह 39वर्ष वाटचालीस शुभेच्छा देऊन सत्कार केला. शुभम नामेकर, सिकंदर शेख,गीताबाई पवार, कलावती चव्हाण, मीनाबाई सुभाष देशमुख आदीसह वृद्धाश्रमातील नागरिक उपस्थित होते. सुखदेव सुकळे यांनी आभार मानले.

COMMENTS