शहरटाकळी ः लोकसभा निवडणूकित जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी स्वीप मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केलेल्या अहवानानुसार तहसीलदा
शहरटाकळी ः लोकसभा निवडणूकित जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी स्वीप मोहिमेंतर्गत जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केलेल्या अहवानानुसार तहसीलदार प्रशांत सागडे, गटविकास अधिकारी राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान शहरटाकळीच्या वतीने गावातून फेरी काढून मतदारांचे प्रबोधन करून मतदान जागृती अभियान राबवण्यात आले. येथील हनुमान मंदिर येथून मतदार जागृती अभियानाला सुरुवात होऊन ठीक ठिकाणी मतदारांचे प्रबोधन करण्यात आले. यावेळी मतदार मोठ्या उत्साहाने यात सहभागी झाले होते, मतदार जागृती अभियाना तून हिंदवी स्वराज प्रतिष्ठानच्या वतीने मतदारांना जागृत करण्याचे कार्य केले. यामुळे येथील मतदानाचा टक्का नक्कीच वाढणार आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मतदार जागृती मोहिमेत हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानला लोकशाहीचा धागा होण्याची संधी दिल्याबद्दल प्रतिष्ठानच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिक रामकृष्ण गोरे, सामाजिक कार्यकर्ते आबासाहेब राऊत, भाऊसाहेब मडके, सिताराम कुंडकर, देविदास चव्हाण, ग्रामविकास अधिकारी सुभाष गर्जे, उत्तम गवळी, हभप अरुणभाऊ इथापे, कनके भाऊसाहेब, हरीचंद्र खंडागळे, आदिनाथ सरकाळे, संदीप गादे, संतोष हत्थे, सह ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मतदान जागृती अभियान यशस्वी करण्यासाठी हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे रामचंद्र गिरम, पत्रकार रविंद्र मडके, महेश भालेराव, मेजर रमेश नरवडे, अॅड. महेश आमले, सह प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
लोकशाहीच्या बळकटीसाठी शासनाचे मतदान जागृती अभियान उपयुक्त आहे, सशक्त व सक्षम लोकशाहीचा हा ऊस्तव आपण शंभर टक्के मतदान करून साजरा करूयात.
सुुभाष गर्जे, ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत शहरटाकळी
मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे, लोकशाहीच्या सदृढतेसाठी मतदानाचे कर्तव्य प्रत्येकाने बजावले पाहिजे.
आबासाहेब राऊत, सामाजिक कार्यकर्ते, शहरटाकळी
COMMENTS