Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत 82 हजार 435 शेतकर्‍यांना मिळणार लाभ

सातारा / प्रतिनिधी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ वितरण शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री दे

सातारच्या जिल्हा रुग्णालयात ओमिक्रॉन बाधितांसाठी अख्खा अतिदक्षता वार्ड राखीव
सातारा जिल्हा परिषदेच्या विविध पदांसाठी नागपूरमध्ये पेपर
राष्ट्रवादीकडे नैतिकता असेल तर जागा ताब्यात द्यावी : जितेंद्र पाटील

सातारा / प्रतिनिधी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ वितरण शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला.
मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमास पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मंत्री मंडळातील इतर सदस्य, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे यांच्यासह सहकार विभागातील अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालय येथून दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांच्यासह जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते.
शेतकरी नियमित पिक कर्ज भरत आहेत अशा ज्या शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण झाले नाही. त्यांनी तालुक्याच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करुन घ्यावे. प्रोत्साहनपर योजनेपासून एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे. पहिली यादी प्रसिध्द झाली असून ज्या पात्र शेतकर्‍यांची नावे नाहीत त्यांनी काळजी करु नये त्यांचीही यादी लवकरच प्रसिध्द केली जाणार आहे. यावेळी प्राथमिक स्वरुपात शेतकर्‍यांचा सत्कारही जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या हस्ते करण्यात आला.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजनेंतर्गत 3 लाख 69 हजार 140 शेतकर्‍यांची कर्ज खाती अपलोड करण्यात आली आहेत. आज अखेर 84 हजार 108 शेतकर्‍यांची नावे प्रसिध्द करण्यात आली आहेत. तसेच 82 हजार 435 शेतकर्‍यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. आत्तापर्यंत 98.60 टक्के काम पूर्ण झाले असून शेतकर्‍यांच्या खात्यावर अंदाजित 290.23 कोटी रक्कम जमा होणार आहे.

COMMENTS