Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जळकोट तालुक्यातील शेतक-यांचे डोळे आकाशाकडे

जळकोट प्रतिनिधी - जळकोट तालुक्यातील शेतकरी मृग नक्षत्र निघाल्यापासून पेरणीसाठी सज्ज झाला आहे. शेतामधील पेरणीपूर्व मशागतीची कामे शेतक-यांनी आटोपू

जयंत पाटील सोडणार शरद पवारांची साथ ?
भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न
तलावात पोहताना तलाठी मुडगूलवार यांचे निधन

जळकोट प्रतिनिधी – जळकोट तालुक्यातील शेतकरी मृग नक्षत्र निघाल्यापासून पेरणीसाठी सज्ज झाला आहे. शेतामधील पेरणीपूर्व मशागतीची कामे शेतक-यांनी आटोपून घेतलेली आहेत. आता शेतक-यांचे डोळे लागलेली आहे ते आभाळाकडे परंतु आभाळातून पावसाच्या धारा येण्याऐवजी सूर्याची किरणे अधिक तीव्रपणे पृथ्वीवर येत आहेत त्यामुळे अर्धा जून संपला तरी पावसाचा पत्ता नाही यामुळे शेतक-यांचीचिंंता वाढली आहे .
जळकोट तालुक्यामध्ये यापूर्वी उन्हाळ्यामध्ये जवळपास महिनाभर पाऊस पडल्यासारखा पडला , यामुळे शिवारामध्ये पेरणी सारखी ओल झाली होती, सलग पडणा-या पावसामुळे शेतक-याची पेरणीपूर्व मशागतीची कामे ठप्प झाली होती . यानंतर अवकाळी पावसाने उघडीप दिली व शेतक-यानी घाईत आपल्या शेतीतील पेरणीपूर्वी मशागतीची कामे आटोपून घेतली. शेती मशागतीची कामे करण्यासाठी बैल असतानाही बैलामुळे वेळेवर काम होणार नाहीत यामुळे शेतक-यांंनी आपल्या पदरचे पैसे खर्च करीत ट्रॅक्टरद्वारे पेरणीपूर्व मशागत करून घेतली . मृग नक्षत्र हे 8 जून रोजी निघालेले आहे यापूर्वी शेतक-यांची पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली होती. हवामान विभागाने देखील महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले असे सांगितलेले होते परंतु मराठवाड्यात अद्यापही मान्सूनचे आगमन झालेले नाही, अरबी समुद्रामध्ये बिपरजॉय नावाचे चक्रीवादळ आल्यामुळे याचा परिणाम मान्सूनवर झाला असून मान्सूनचे आगमन लांबणीवर पडणार असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त केला जात आहे तसेच हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील हा अंदाज व्यक्त केला आहे. मराठवाड्यामध्ये मान्सूनच्या आगमनासाठी आणखीन 8 ते 10 दिवसाच्या कालावधी लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे . मान्सन लवकर येईल व पेरणी लवकर लागेल या अशाने शेतक-यांनी कृषी दुकानांमधून महागाचे बी बियाणे आपल्या घरी नेऊन ठेवले आहेत तर काही शेतकरी बी- बियाणे खते घेऊन जात आहेत . गतवर्षीचा शेतक-याचा शेतीमाल घरातच आहे अशा परिस्थितीमध्ये देखील कर्ज काढून शेतकरी खते बी बियाणे घरी नेऊन ठेवत आहे मात्र वेळेवर पेरणी नाही झाली तर याचा फटका उत्पादनावर होणार हे नक्की आहे.

COMMENTS