औरंगाबाद ः जिल्हा प्रशासन व वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव समितीच्या वतीने यंदा बहुप्रतिक्षित वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव 2023 चे येत्
औरंगाबाद ः जिल्हा प्रशासन व वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव समितीच्या वतीने यंदा बहुप्रतिक्षित वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव 2023 चे येत्या 25 ते 27 फेब्रुवारी दरम्यान आयोजन केले आहे. या महोत्सवाच्या पूर्वरंगमध्ये बुधवारी दि.15 फेब्रुवारीपासून भारूड, पोवाडा, गोंधळ आदी लोककलांचे रंग उधळले जाणार आहेत. झाशी राणी पुतळा, क्रांतीचौक येथे बुधवारी रात्री 7 ते 9 वाजेदरम्यान लोककलावंतांनी विविध लोककला सादर केल्या. यात शेखर भाकरे यांनी भारूड सादर केले. अजिंक्य लिंगायत पोवाडा सादर करतील तर गोंधळाचे सादरीकरण सुमित धुमाळ करणार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेण्यांची ओळख दृढ करण्यासाठी 1985 पासून वेरूळ अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित केला जातो. यंदा तब्बल सात वर्षानंतर औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त व वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष दिलीप शिंदे व बी. एन. पाटील संचालक, पर्यटन संचालनालय ,महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने हा महोत्सव परत एकदा सुरू करण्यात येत आहे. दोन सत्रात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल परिसरात हा वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव येत्या 25 ते 27 दरम्यान होत आहे. या सांस्कृतिक महोत्सवाच्या वातावरण निर्मितीसाठी व स्थानिक कलाकारांच्या कलेला वाव देण्याच्या दृष्टीने शहरातील विविध भागांमध्ये पूर्वरंग कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यात 18 तारखेला पैठण गेट येथे रात्री 8 वाजता राहूल खरे यांचे भावगीत गायन व पं. विश्वनाथ दाशरथे यांचे उपशास्त्रीय गायन होईल. 21 तारखेला रात्री 8 वाजता दिल्ली गेट येथे झाामा कव्वाली ग्रुप कव्वाली सादर करेल तर 23 तारखेला लॉन्स मपविम, रेल्वे स्टेशन रोड येथे सायंकाळी 6.30 वाजता कृषी पर्यटन विषयावर सौरभ कृष्णा यांचे व्याख्यान, श्रीमंत औरंगाबाद विषयावर अजय कुळकर्णी यांचे व्याख्यान होईल. वेरूळ -अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचा औरंगाबाद शहरवासी तसेच शहरात येणार्या सर्व पर्यटकांनी आनंद घ्यावा, असे प्रशासनाने केले आहे.
COMMENTS