Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला लाच स्वीकारताना रंगेहात अटक

  वर्धा प्रतिनिधी - वर्ध्याच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला राशन दुकानदाराकडून 20 हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे

मनपाची 36 वाहने भंगारात; नवीन कार खरेदीचा प्रस्ताव प्रलंबित
शाळांमध्ये ’वाचन चळवळ’ राबवणार
*मराठवाडयात दोन तरूण शेतकर्‍यांच्या आत्महत्या l DAINIK LOKMNTHAN *

  वर्धा प्रतिनिधी – वर्ध्याच्या जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला राशन दुकानदाराकडून 20 हजार रुपयांची लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. वर्ध्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी विजय कृष्णराव सहारे याने देवळी येथील राशन दुकानदाराकडे 50 हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडित 40 हजार रुपये देण्याचे मान्य करण्यात आले. लाचलुचपत विभागाने रात्री सापळा रचून वर्ध्याच्या शासकीय विश्राम गृहात रंगेहात 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला पकडण्यात आले आहे. पुरवठा अधिकाऱ्याला लाच स्वीकारण्यास मदत करणाऱ्या ऋषिकेश रमेशराव ढोडरे खाजगी दलाला देखील ताब्यात घेण्यात आले आहे.  देवळी येथील राशन दुकानदाराकडे दोन राशन दुकानातील नियमित हप्ता देण्याचा तगादा जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश कृष्णराव सहारे याने लावला होता. सात महिन्याचे 25 हजार रुपये मागणी करण्यात आली. तसेच पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत राशन दुकानदारांना मिळणाऱ्या कायदेशीर कमिशनमधून 25 हजार अशा एकूण 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. तडजोडी अंती राशन दुकानदाराने 40 हजार रुपये देण्यास समर्थता दाखविली होती. ठरल्याप्रमाणे रात्री दरम्यान वर्ध्याच्या शासकीय विश्रामगृहात पहिल्या हप्ता 20 हजार रुपयांची रक्कम देत असताना लाचलुचपत विभागाने सापळा रचून पुरवठा अधिकाऱ्याला रंगेहात पकडले आहे. प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर तो राहत असलेल्या विश्रामगृहाच्या खोलीत वेगवेगळ्या पाकिटात 5 लाख 60 हजार 360 रुपये मिळून आले आहे. जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे असणारी ही पाकिटातील रक्कम कशाची याची देखील पडताळणी केली जात आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश सहारे आणि ऋषिकेश ढोडरे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. वर्धा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

COMMENTS