जलमोती की मच्छरमोती? :पाण्याच्या बाटलीत मच्छर :

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

जलमोती की मच्छरमोती? :पाण्याच्या बाटलीत मच्छर :

जामखेड प्रतिनिधी :  शुद्ध पाणी मिळेल या विश्‍वासाने नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी महागड्या बंद बाटल्या खरेदी करत असतात; परंतु जामखेड मधील "जलमोती" या

समृद्धी गायकवाडचे नवोदय परिक्षेत घवघवीत यश
जायनावाडीतील तरूणांनी केले ई-पिक पहाणी करण्याचे ग्रामस्थांना आवाहन
Ahmednagar :नगरमधील मंदिरे खुली करण्यासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक | LOK News24

जामखेड प्रतिनिधी :  शुद्ध पाणी मिळेल या विश्‍वासाने नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी महागड्या बंद बाटल्या खरेदी करत असतात; परंतु जामखेड मधील “जलमोती” या नावाने विकल्या जाणाऱ्या बाटल्यांमधील पाणी अशुद्ध, पिण्यायोग्य नसल्याचे समोर आले आहे. जलमोतीच्या सिलबंद बाटलीमध्ये मेलेले मच्छर आढळून आले आहेत. बसस्थानकावर, ढाब्यावर, शाळा परिसरात, हाँटेल, दवाखाण्यात आदी ठिकाणी या विक्रीसाठी ठेवल्या जातात शुद्ध समजून या  बाटलीतले पाणी पिण्यासाठी नागरिक विकत घेतात.  अस्वच्छ पाण्यामुळे अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. शुद्ध पाणी समजुन नागरिक बंद बाटलीतले पाणी विकत घेतात मात्र अशुद्ध पाणी विकून गोरखधंदा करणारे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत आहेत. या गंभीर बाबीकडे अन्न व औषध प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे. यापूर्वीही या जलमोती पाण्याच्या अनेक तक्रारी आल्या. मात्र कंपनी मालकाने तक्रारींबाबत गांभीर्याने कधीच घेतले नाही. स्थानिक पातळीवर आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे.जलमोती या कंपनीत कामगारांच्या व परिसराच्या स्वच्छतेबाबत नागरिकांना माहिती झाल्यास कोणीही हे पाणी घेणार नाही अशी परिस्थिती आहे. एकुणच बाटली बंद पाण्याचा व्यवसाय करणारी जलमोती कंपनी व आरोग्य विभाग नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहेत अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. 

COMMENTS