Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

इस्लामपूरचे उपजिल्हा रुग्णालय कायाकल्प अभियानात राज्यात दुसरे; दहा लाख रुपयांचे मिळणार बक्षीस

इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय कोविड लसीकरणात देशात अव्वलइस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात एकाच केंद्रावर देशात सर्वाधिक 1 लाख 20 हजार इतके लसीकरण

राष्ट्रपती रायगड दौर्‍यानिमित्त हेलिपॅडला विरोध झाल्याने राष्ट्रपती गडावर ’रोप वे’ ने जाणार
पोपट कुंभार बंधुता काव्यप्रतिभा पुरस्काराने सन्मनीत
येलूरमध्ये तीन सोसायट्यांच्यावर महाडिक गटाचा झेंडा

इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालय कोविड लसीकरणात देशात अव्वल
इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात एकाच केंद्रावर देशात सर्वाधिक 1 लाख 20 हजार इतके लसीकरण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपजिल्हा रुग्णालयाला अभिनंदनाचे पत्र पाठवून कोविड काळातील उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाचे कौतुक केले आहे.

इस्लामपूर / प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या कायाकल्प अभियानात इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयाला राज्यस्तरावरील दुसर्‍या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. 2021-22 या वर्षासाठी इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयाला राज्यात द्वितीय मानांकन आणि 10 लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाल्याची माहिती इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप पाटील व वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. आर. देशमुख यांनी पत्रकार बैठकीत दिली.
ते म्हणाले, इस्लामपूरचे उपजिल्हा रुग्णालय राज्यातील सर्व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातून राज्य स्तरावर दुसर्‍या क्रमांकाला पोचले आहे. माजी मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून टाटा ट्रस्टकडून मिळालेल्या मदतीतून रुग्णालयाचा कायापालट झाला आहे. रुग्णालयात आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या सेवा सुविधा दिल्या जात आहेत. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या पथकाकडून
चार महिन्यांपूर्वी मूल्यांकन झाले होते. यात रुग्णालयातील स्वच्छता, इमारत रचना, पायाभूत सुविधा, वैद्यकीय यंत्रणा व सुविधा, सोनोग्राफी, डिजिटल एक्सरे, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह अन्य सुविधा, रुग्णांचा प्रतिसाद, कर्मचारी प्रशिक्षण, तांत्रिक ज्ञान आदी विविध बाबींची पाहणी केली होती. या मूल्यांकनातून राज्यभरातील 152 रुग्णालयांना मानांकन देण्यात आली आहेत. इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयाला दुसर्‍या क्रमांकाचे मानांकन मिळाले. ही आमच्यासाठी आनंददायी बाब आहे. सांगली जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या सहभागातून हे यश मिळाले आहे. येत्या वर्षात राज्यात प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न असणार आहे.

आतंरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुविधांचा लाभ रुग्णांनी घ्यावा
इस्लामपूरचे उपजिल्हा रुग्णालय चाळीस खाटांचे आहे. इथे स्वतंत्र अति दक्षता विभाग, विविध ऑपरेशन थिएटर्स आहेत. बालरोग, अस्थीरोग, जनरल सर्जरी, जनरल मेडिसीन, स्त्री रोग, नेत्ररोग, फिजिओथेरपी असे विविध विभाग आहेत. अतिशय अल्प दरात सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रेच्या मशिन्स उपलब्ध आहेत. सर्व प्रकारच्या रक्ताच्या तपासण्या मोफत केल्या जातात. महिलांच्या प्रसूतीसाठी स्वतंत्र ऑपरेशन थिएटर उपलब्ध आहे.
अपेंडीक्स, हर्निया, मुतखडा, नसबंदी यासह विविध प्रकारची ऑपरेशन इथे केली जात आहेत. महात्मा फुले आरोग्य योजनेच्या माध्यमातून ऑपरेशन केली जातात. या सर्व सुविधांचा लाभ तालुक्यातील रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कोविडच्या काळात 100 खाटांचे तात्पुरते रुग्णालय निर्माण करण्यात आले आहे. गरजेनुसार याच्याही उपयोग करण्यात येत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. दिलीप पाटील यांनी दिली.

COMMENTS