Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यावर रानडुक्कराचा भिषण हल्ला; शेतकरी गंभीर जखमी

शिराळा / प्रतिनिधी : किनरेवाडी, ता. शिराळा येथील शेतकर्‍यांवर वन्य प्राण्याने अचानक हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.घटनास्थळावरुन मिळ

सातार्‍यात ‘शिवराज्य दरबार स्फूर्तीस्थान’ उभारणार : श्री. छ. वृषालीराजे भोसले
शाळाबाह्य मुलांना सहल घडवत इस्लामपूरमध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा
कदमवाडी येथील जळीतग्रस्त कुटुंबास शिवसमर्थ संस्थेची आर्थिक मदत

शिराळा / प्रतिनिधी : किनरेवाडी, ता. शिराळा येथील शेतकर्‍यांवर वन्य प्राण्याने अचानक हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.
घटनास्थळावरुन मिळालेली माहीती अशी की, मंगळवारी सकाळी नेहमी प्रमाणे जाळीचा वरा नावाच्या शेतात शाळू राखण्यासाठी गेलेल्या शेतकर्‍यांवर 11.30 च्या सुमारास अचानक हल्ला केल्याने शेतकरी जखमी झाला. वन हद्दीतून डोंगराच्या दिशेने वन्य प्राण्याने पळत येवून तुकाराम दत्तू लोहार (वय 50, रा. किनरेवाडी) यांच्यावर अचानक हल्ला चढवला. या हल्ल्यात लोहार यांच्या डाव्या पायाला जबर जखम झाली आहे. ही घटना सकाळी 8 च्या सुमारास घडली. लोहार यांनी आरडा-ओरडा केल्यानंतर बाजूच्या गुराखी महीला व शेतकर्‍यांनी तात्काळ धाव घेतली. त्यातील अलका लोहार या महिलेने ही घटना वाडीत येवून सांगितली. त्यानंतर घटनास्थळी राकेश सुतार, लक्ष्मण सुतार, बि. टी. किनरे, संतोष लोहार, काशिनाथ लोहार, मच्छिंद्र खोपडे, सुशांत लोहार यांनी जावून लोहार यांना जखमी अवस्थेत कापडाची झोळी करुन उचलुन किनरेवाडी येथील उपकेंद्रात उपचारासाठी आणले. परंतू त्या ठिकाणी कोणीही नसल्याने चरण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहीकेतून आणण्यात आले. लोहार यांच्या पायाला खोलवर जखम झाली आहे. पाठीलाही जबर मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी शासकिय रुग्णालयात (सिपिआर) कोल्हापूर येथे पाठवले आहे. घटनास्थळी वन विभागाचे कोणताही अधिकारी आले नसल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली होती. मात्र, या घटनेमुळे शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाच्या अधिकार्‍यांनी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांमधून होत आहे. डोंगर वस्ती व गावामधील शेतकर्‍यांना बिबट्या व रानरेडा व विविध प्रकारच्या वन्य प्राणाचा उपद्रव वाढला आहे. हे प्राणी पिकाचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. याकडे वन विभागाने लक्ष देऊन वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा, जखमी लोहार यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

COMMENTS