Homeताज्या बातम्यासंपादकीय

उदयनराजेंचे आंदोलन श्रेयासाठी ? 

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात राज्यात खासदार उदयनराजे भोसले

डॉ. हरी नरके : अकाली निधनाने महाराष्ट्र हळहळतो !
शेणाची निवडणूक! 
अखेर, आव्हान मिळालेच…!

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याच्या विरोधात राज्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी थेट आंदोलनाचा पवित्र घेतला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले. त्याविरोधात उदयनराजे आक्रमक झालेत. त्यांनी आज रायगडवर ‘निर्धार शिवसन्माचा’ म्हणत कूच केले. राज्यपाल पदावरून कोश्यारींना हटवा, अन्यथा मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करू असा इशारा दिलाय. त्यानंतर उदयन राजे यांनी लिहिलेले हे पत्र समोर आले आहे. अर्थात याच आंदोलनादरम्यान त्यांना भाजप आणि खासदारकीचा राजीनामा देणार काय, असा प्रश्न किंवा आव्हान केल्यानंतर, त्यांनी, त्या संदर्भात मी ठरवेल! अशा प्रकारचे उत्तर  दिले आहे. मात्र, त्यांनी राज्यपाल यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनानंतर राष्ट्रपतींकडे गेलेल्या पत्रातून काही प्रमाणात खळबळ झालेली आहे. याचाच अर्थ महाराष्ट्रातील इतर कोणत्याही राजकीय पक्षाला राज्यपालांच्या उचल बांगडीचे श्रेय जाऊ नये, म्हणून उदयनराजे भोसले यांना भाजपच्याच गोटाकडून आंदोलन करण्यासाठी पुढे करण्यात आले असावे, असा संशय राजकीय जाणकारांना येत आहे. अर्थात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यापूर्वी अनेक महापुरुषांच्या विषयी वादग्रस्त वक्तव्य केली. महाराष्ट्रात मराठीत एक म्हण आहे! हसून दात पाडणे, याचप्रकारे राज्यपाल आपल्या वक्तव्यातून हसून महापुरुषांची बदनामी करत असतात, असा आजपर्यंतचा अनुभव दिसला आहे. यापूर्वी त्यांनी महात्मा फुले यांच्या विषयी देखील अशाच प्रकारचे विधान केलं होतं. या विरोधात महाराष्ट्रातील राजकीय विरोधक, त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातील विचारवंत, कार्यकर्ते वेगवेगळ्या चळवळी आणि संघटना यामधूनही प्रतिक्रिया उमटल्या. परंतु, राज्यपाल बदलण्याचे वारे तयार झाले नाही. मात्र, आता राज्यपालांनी केलेल्या अतिरेकाला सहन करणे हे सत्ताधारी पक्षालाही जड जात असल्यामुळे, त्यांची उचलबांगडी करण्याचे जवळपास निश्चित झालेले दिसते! परंतु, त्याचे श्रेय राज्यातील विरोधी पक्षाला किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, नेते, विचारवंत यांना मिळू नये, म्हणून उदयनराजे भोसले यांना राज्यपालांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी पुढे आणले, असावे असा कयास सर्व स्तरातून व्यक्त होत आहे! अन्यथा, आंदोलन करण्याआधीच उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा त्याग केला असता; जो त्यांच्या स्वभावाचा स्वाभाविक भाग आहे. अर्थात उदयनराजे भोसले यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा विरोध करताना आक्रमक भाषाच वापरली आहे. तरीही, त्यांचं एकूण आंदोलन हे ठरवून असल्याचा संशय महाराष्ट्राच्या मनात निश्चितपणे आहे. अर्थात त्यांच्या आंदोलनामुळे राज्यपालांची महापुरुषांच्या बदनामी प्रकरणात उचलबांगडी होत असेल, तर ती महाराष्ट्रासाठी एक चांगली बाब आहे; असे निश्चितपणे मानावे लागेल. कोणत्याही गोष्टीचा कार्यकारणभाव काहीही असला तरी त्याच्यातून परिणाम साध्य होत असेल तर तो निश्चितपणे स्वागतार्ह असतो. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोसरी यांनी राजभवनाचा आणि त्यांच्या पदाचा खास करून राजकीय पद्धतीनेच अधिक वापर केला, असा महाराष्ट्राचा त्यांच्या कार्यकाळात समज झालेला आहे. या संदर्भात राज्यपालांनी कधी निरसनही केल्याचा प्रयत्न केलेला नाही. याचाच अर्थ या भूमिका या त्यांनी ठरवून केलेल्या आहेत असा आरोप त्यांच्यावर यापूर्वीही करण्यात आला आहे. 

COMMENTS