Homeताज्या बातम्यासंपादकीय

शेणाची निवडणूक! 

राजस्थान चे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना निवडणूक काळात घेरण्याची रणनिती केंद्रातील चाणक्यांनी केली असली तरी, मानसिक पातळीवर आपण खचलो नसल्याचे दा

“४९८ अ”वर पुनर्विचार करण्याची शिफारस!
विरोधाची एकजूट : पर्याय आणि अडचणी !
काॅंग्रेस सोबतचे शीतयुद्ध…! 

राजस्थान चे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना निवडणूक काळात घेरण्याची रणनिती केंद्रातील चाणक्यांनी केली असली तरी, मानसिक पातळीवर आपण खचलो नसल्याचे दाखवून देत असताना गेहलोत यांनी राजस्थानात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांना ७ गोष्टींची हमी दिली आहे. यातील पहिली हमी त्यांनी दिली ती म्हणजे एक कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना ५०० रूपयात गॅस सिलेंडर, दुसऱ्या स्थानावर महिला कुटुंब प्रमुखाला वर्षाकाठी १० हजार रुपये, त्याचबरोबर सरकारी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थ्थिनींना लॅपटॉप, सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना, सक्तीचे इंग्रजी शिक्षण,  १५ लाखाचे विमा संरक्षण अशा महत्वपूर्ण आश्वासन अशोक गेहलोत यांनी मतदारांना दिले आहे. मात्र, यात लक्ष वेधून घेणारी बाब आहे, ती म्हणजे गायीचे शेण दोन रुपये किलोने सरकार विकत घेईल! गाय २०१४ नंतरच्या राजकारणात अधिक महत्वाची ठरली आहे. परंतु, आता त्या गाईचे शेण देखील राजकारणात महत्वपूर्ण ठरू पाहत आहे काय? असा प्रश्न विचारल्याशिवाय राहता येणार नाही. राजस्थानात सरकारी नोंदणीनुसार ११६० एवढ्या गोशाळा आहेत. यात जवळपास ५ लाख गाई आहेत. एवढ्या गाईंचे शेण विकत घेणे हे निवडणूकीच्या राजकारणात मतदारांना आश्वासन देण्याइतपत महत्वपूर्ण झाल्याचे आता आश्चर्य वाटणारे नाही. अर्थात, राजस्थानात बायोगॅस प्रकल्प देखील मोठ्या प्रमाणात असल्याने त्याठिकाणी इंधन म्हणून शेणाचा वापर केला जाऊ शकतो. राजस्थानात इंधनाचा प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात शेण सुकवून त्याचा उपयोग केला जातो. मात्र, याचा अर्थ त्याला निवडणुकीतील ७ प्रमुख आश्वासनात स्थान मिळेल, याची साधारणपणे कोणी अपेक्षा केली नसेल. देशातील पाच राज्यांमध्ये नोव्हेंबर महिन्यात निवडणूका होत आहेत. यातील सर्वच राज्यात चुरशीच्या निवडणूका होणार असल्या तरी राजस्थानमध्ये चुरस थोडी अधिक आहे.ज्याचे कारण याच राज्यात केंद्रातील सत्ताधारी भाजपला देखील विजयाची थोडी अपेक्षा वाटत आहेत. यातूनच त्यांनी काल काॅंग्रेसचे मुख्यमंत्री गेहलोत यांच्या मुलाला आणि राजस्थान काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांना ईडी च्या माध्यमातून घेरले आहे. दुसऱ्या दिवशी गेहलोत खचतील, असा अंदाज बांधणाऱ्यांना गेहलोत यांनी कृतीतून धक्का दिला आहे. अशोक गहलोत  यांची ही निवडणूक रणनीती कर्नाटकाच्या धरतीवरच आहे. मात्र, कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत दिलेली आश्वासने यापेक्षा राजस्थान विधानसभा निवडणुकीत दिली गेलेली काही आश्वासन ही वेगळी आहेत. अशोक गहलोत यांनी राजस्थान विधानसभा निवडणूक जिंकण्याचा संघ बांधला आहे ही गोष्ट त्यांच्या समर्थनात त्यांचे पक्षांतर्गत विरोध सचिन पायलट यांनी पत्रकार परिषद घेऊन एकूणच त्यांच्या मुलावर झालेली कारवाई आणि राजस्थान काँग्रेस पक्षाध्यक्षांवर झालेली कारवाई या विरोधात आवाज उठवला. याचा सरळ अर्थ असा होतो की, गेहलोत आणि पायलट ही पक्षांतर्गत धूसफूस असणारी जोडी ऐन निवडणूक काळात एकत्र आली आहे. तर, दुसऱ्या बाजूला भाजपचा आत्मविश्वास निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने काहीसा संभ्रमावस्थेत असल्याचे दिसते. अर्थात, या सर्वांपेक्षा निवडणूक जाहीरनाम्यात गायीच्या शेणाला थेट खरेदीमूल्य प्रदान करणारी त्यांची निवडणूक रणनीती अधिक आश्चर्य करायला लावणारी असली, तरी, राजस्थानातील राजकारणाचा तो आवश्यक भाग बनला आहे.

COMMENTS