Homeताज्या बातम्यादेश

उद्धव ठाकरे मोदींशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात

आमदार रवी राणा खळबळजनक दावा

नवी दिल्ली ः महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय धक्के बघायला मिळू शकतात असा दावा भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून करण्

शंकरराव गडाख संकाटात साथ देणारा मित्र – उद्धव ठाकरे
मोदी म्हणजे भेकड पक्षाचे नेते- उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी सगळा महाराष्ट्र भ्रष्टाचार युक्त करून टाकला

नवी दिल्ली ः महाराष्ट्राच्या राजकारणात लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय धक्के बघायला मिळू शकतात असा दावा भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांकडून करण्यात येत आहे. काँगे्रससोबतच इतर गटातील ज्येष्ठ नेते भाजपसोबत येण्यास अनुकूल असल्याचे वक्तव्य होत असतांना उद्धव ठाकरे महाविकास आघाडीची साथ सोडणार असून, ते पंतप्रधान मोदींशी संपर्क करण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहीर करतील, असा दावा राणा यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे महाविकास आघाडीच्या घटकपक्षांत मोठी खळबळ माजली आहे. उद्धव ठाकरे सध्या प्रचंड बैचेन आहेत. मोदींशिवाय आपल्याला पर्याय नसल्याचे आता त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ते लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मोदींना पाठिंबा देऊन त्यांचे नेतृत्व स्वीकारतील, असे ते म्हणालेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. भाजपने महाराष्ट्रातील 48 पैकी 45 हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी केंद्रातील या सत्ताधारी भगव्या पक्षाकडून विरोधी पक्षांतील बड्या नेत्यांना गळाला लावले जात आहे. पण आता अपक्ष आमदार रवी राणा यांनी महाविकास आघाडीतील महत्त्वाचे नेते असणारे उद्धव ठाकरे हेच भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा करत एकच खळबळ उडवून दिली आहे. एवढेच नाही तर ठाकरे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारणार असल्याचा दावाही त्यांनी या प्रकरणी केला आहे. उद्धव ठाकरे यांना अहंकारामुळे छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा विसर पडला होता. याचे आत्मचिंतन मातोश्रीवर मोठ्या प्रमाणात सुरू झाले आहे. रश्मी वहिणी असू द्या किंवा आदित्य ठाकरे असू द्या. हे सर्वजण आपण किती चुकलो व किती चुका केल्या याचे चिंतन करत आहेत. आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय पर्याय नाही हे आता त्यांच्या लक्षात आले असल्याचे राणा यांनी राजधानीमध्ये पत्रकारांशी बोलतांना म्हटले आहे.

COMMENTS