Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पक्ष पळवणार्‍यांची टोळी सक्रिय

उद्धव ठाकरे ठाकरेंची भाजपवर जहरी टीका

यवतमाळ/प्रतिनिधी ः देशात भाजपकडून अतिशय घाणेरडे राजकारण सुरू असून, अगोदर पक्ष फोडले जायचे, मात्र आता पक्षच पळवणार्‍यांची टोळी सक्रिय असून, ही टोळ

पीएम फंडासह मुंबई-ठाणे मनपाची चौकशी करा
ठाकरे गटाला धक्का
उद्धव ठाकरे संपलेला माणूस?

यवतमाळ/प्रतिनिधी ः देशात भाजपकडून अतिशय घाणेरडे राजकारण सुरू असून, अगोदर पक्ष फोडले जायचे, मात्र आता पक्षच पळवणार्‍यांची टोळी सक्रिय असून, ही टोळी पक्षच पळवत सुटल्याची जहरी टीका ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली. यवतमाळमध्ये पत्रकारांशी ते बोलत होते. उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भाच्या दौर्‍यावर गेले आहे. यात ते वाशिम, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यांचा दौरा करणार आहे.
यावेळी उद्धव ठाकरेंनी पोहरादेवीचे दर्शन घेतले. यावेळी ते म्हणाले की, बर्‍याच दिवसाने संतांच्या व आई जगदंबेच्या दर्शनाला आलो आहे. हात जोडून मागणे आहे, आज माझ्याकडे पक्ष नाही, काहीही नाही, मात्र, तुमच्या सर्वांच्या प्रेमाने मी भारावून गेलो आहे. पुढील लढाईत माझ्या खांद्याला खांदा लावून लढा, अशी विनंती करत आहे. असे उद्धव ठाकरे पोहरादेवी मंदिराच्या आवारातून म्हणाले. तत्पूर्वी त्यांनी जगदंबा देवीचे दर्शन घेतले. रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर बाबूसिंग महाराज यांच्याकडून तलवार व कडा त्यांना भेट देण्यात आली. यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, आधी आमदार किंवा पक्ष फुटायचा, आता पक्षच पळवला जातो आहे. राजकारणात फोडाफोडी काही नवीन नाही. परंतु असा प्रकार पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. सध्या राज्यात जे घडत आहे, ते चुकीचे असल्याचं अनेक लोक मला येऊन सांगाताहेत. महाराष्ट्रासह देशातील असंख्य शिवसैनिक मला मातोश्रीवर भेटत आहे. त्यामुळे मी आता कार्यकर्त्यांशी बोलण्यासाठी आणि भेटण्यासाठी बाहेर पडल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. सध्या आमच्या शिवसेनेत सांगली, सातारा आणि सोलापुरातील अनेक कार्यकर्ते प्रवेश करत आहे. ज्यांच्यावर मी अन्याय केला, त्यांना मोठी संधी मिळत असल्याचे ठाकरेंनी म्हटले आहे. शिवसेनेतील आमदार फुटले असतील परंतु जसे आमचे नितीन देशमुखांनी जसे सांगितले की, पीक तुमचे असेल परंतु शेती आमची आहे ना, त्यामुळे तिकडे कितीही लोके गेले असतील तर आम्ही नव्याने पक्ष उभा करणार असल्याचेही ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. बाळासाहेबांचे नाव घेऊन राजकारण करत असलेले लोक आज सत्तेत आहे, परंतु बाळासाहेबांना अटक करणार्‍या छगन भुजबळांच्या मांडीला मांडी लावून कोण बसले?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला केला आहे. त्यामुळे आता यावरून शिंदे आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे.

शहांनी मुख्यमंत्रिपदाचा दिलेला शब्द मोडला – उद्धव ठाकरे म्हणाले, मी पोहरादेवीची शपथ घेऊन सांगतो की, अमित शहांनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता. मात्र, नंतर तो शब्द त्यांनी पाळला नाही. आम्हाला युतीच्या बाहेर ढकलले. तेव्हाच तो शब्द पाळला असता तर भाजपच्या कार्यकर्त्यांना आता इतरांच्या सतरंज्या उचलाव्या लागल्या नसत्या. भाजपने आता आपल्यासोबत आलेल्या बाजारबुणग्यांना सांभाळावे, एवढेच काम भाजपला राहीले आहे.

COMMENTS