Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विद्यापीठ खेळाडूंना पुन्हा 25 वर्षाची अट; कोरोनामुळे दिलेली सवलत खंडित

लातूर प्रतिनिधी - कोरोना काळात नुकसान झालेल्या खेळाडूंसाठी भारतीय विश्वविद्यालय संघाने मागील दोन वर्षी वयोमर्यादा वाढविली होती. त्यामुळे खेळाडूंच

ओबीसींच्या आरक्षणात वाटेकरी होवू देणार नाही  
सरपंचाच्या गाडीवर गोळीबार, सरपंच थोडक्यात बचावले | LOK News 24
मेस्मा लावण्याची धमकी म्हणजे मुघलशाही…पडळकरांची परबांवर टीका | LOKNews24

लातूर प्रतिनिधी – कोरोना काळात नुकसान झालेल्या खेळाडूंसाठी भारतीय विश्वविद्यालय संघाने मागील दोन वर्षी वयोमर्यादा वाढविली होती. त्यामुळे खेळाडूंचे नुकसान टळले. आता स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पूर्ववत 25 वर्षांची अट खेळाडूंना लागू करण्यात आली आहे.
कोरोना काळात दोन वर्ष अनेक क्षेत्रांचे नुकसान झाले. त्यात क्रीडाक्षेत्रही होते. दोन वर्षे स्पर्धा न झाल्याने खेळाडूंचे नुकसान झाले होते. त्याची दखल घेत भारतीय विश्वविद्यालय संघाने खेळाडूंना स्पर्धेसाठी खेळण्यासाठीच्या वयोमर्यादेत वाढ केली होती. सन 2021- 22 या काळात वयोमर्यादा 25 वरून 26 वर्षे अशी करण्यात आली होती. त्यानंतर सन 2022- 23 साठी वयोमर्यादा 27 वर्ष करण्यात आली होती. त्यामुळे खेळाडूंचे दोन वर्षांचे नुकसान भरून निघाले. त्यानंतर आता यंदाच्या अकॅडमिक वर्षात खेळाडूंना स्पर्धेत भाग घेण्याची अट पूर्वीप्रमाणेच 25 वर्षे करण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक भारतीय विश्वविद्यालय संघाने सर्व कुलगुरूंना पाठविले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात सहभागी होणार्‍या खेळाडूंना 25 वर्षाची वयोमर्यादा कायम राहणार आहे. सन 2020- 21 साली आंतर विद्यापीठ व क्रीडा महोत्सव ही स्पर्धा झाली नाही, तर 2021- 22 काळात काही खेळांच्या स्पर्धा आंतर विद्यापीठ स्तरावर झाल्या. मात्र क्रीडा महोत्सव या वर्षात झाला नाही.

COMMENTS