Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहिल्यादेवी होळकरांच्या वंशजाच्या हाती तुतारी

भूषणसिंहराजे यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

पुणे ः लोकसभा निवडणुकीनिमित्त प्रचाराची रणधुमाळी जोमात सुरू असतांना बंडखोर आणि आयाराम-गयाराम यांची संख्या वाढतांना दिसून येत आहे. त्यातच गुरूवारी

कॉलेजियममध्ये लोकप्रतिनिधी हवा
मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन गुढीपाडवा आनंदी करावा – आ. सुनील भुसारा
मुख्यालयात राहण्याची अट शिथील करा…शिक्षकांचे उद्या नागपुरात धरणे

पुणे ः लोकसभा निवडणुकीनिमित्त प्रचाराची रणधुमाळी जोमात सुरू असतांना बंडखोर आणि आयाराम-गयाराम यांची संख्या वाढतांना दिसून येत आहे. त्यातच गुरूवारी राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि मल्हारराव होळकर यांचे वंशज भूषणसिंहराजे होळकर यांनी शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये अधिकृत प्रवेश केला. पुण्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे आणि रवींद्र धंगेकर यांनी लोकसभेसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमावेळी भूषणसिंहराजे होळकर यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केला. आगामी लोकसभा निवडणुकीत भूषणसिंह होळकर यांनी आपल्या हाती तुतारी घेतली आहे. भूषणसिंह होळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागली.

बारामती आणि माढा मतदारसंघात फायदा होईल यासाठी खासदार शरद पवारांनी महादेव जानकर यांना सोबत घेण्याचे ठरवले होते, मात्र ऐनवेळी जानकर यांनी महायुतीमध्ये जाणे पसंद केल्यामुळे शरद पवारांनी पुन्हा एकदा धनगर मतदार आकर्षित करण्यासाठी खेळी खेळल्याचे बोलले जात आहे. भूषणसिंह होळकर यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केल्यामुळे या पक्षाची ताकद वाढली आहे. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे शरद पवार यांना बारामती लोकसभा मतदारसंघात मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण या मतदारसंघामध्ये धनगर मतदारांची संख्या जास्त आहे. भूषणसिंहराजे होळकर यांच्याकडून धनगर मतदारांना एकत्रित करण्याचा आणि आकर्षित करण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून गेला जाऊ शकतो. यामुळे सुप्रिया सुळे यांना या मतदार संघात अधिक मत मिळवण्यासाठी फायदा होऊ शकतो.  पुण्यामध्ये महाविकास आघाडीची रॅली झाली. यावेळी महाविकास आघाडीतील अनेक प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली. महाविकास आघाडीच्या या प्रचार रॅलीमध्येच भूषणसिंह होळकर यांनी आज शरद पवार गटामध्ये केला. भूषणसिंह होळकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत देखील भूषणसिंह होळकर यांचा समावेश आहे. भूषणसिंहराजे होळकर हे आधी भाजपसोबत होते. पण गेल्या काही दिवसांपासून त्यांची शरद पवारांसोबत जवळीक वाढली होती. भूषणसिंह यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील शरद पवार यांच्या कार्यालयात त्यांची भेट घेतली होती. या भेटीपासूनच भूषणसिंह हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर त्यांनी तुतारी हातात घेत शरद पवारांच्या पक्षात अधिकृत राजकीय प्रवेश केला आहे.

COMMENTS