Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज कुंद्राची 97 कोटींची मालमत्ता जप्त

बिटकॉईन प्रकरणी ईडीने केली कारवाई

मुंबई ः 2021 मध्ये पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेले व्यापारी तसेच शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्या मालमत्तेवर टाच आली आहे. अंमलबजावणी सं

जमिनीच्या वादातून भावकी मध्ये वाद एकमेकांवर कुऱ्हाडीने केला हल्ला.
पुणतांब्यात कापूस चोरणारा अटकेत
महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजीच्या दरात कपात

मुंबई ः 2021 मध्ये पॉर्नोग्राफी प्रकरणात अटकेत असलेले व्यापारी तसेच शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांच्या मालमत्तेवर टाच आली आहे. अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने कुंद्रा यांची 97 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
ईडीने कुंद्राच्या ज्या मालमत्ता जप्त केल्या आहेत त्यात शेट्टी यांच्या जुहू येथील बंगल्याचाही समावेश आहे. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा म्हणजेच पीएमएलए-2002 अंतर्गत कुंद्रा यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे शिल्पा शेट्टीची इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या राजस्थान रॉयल्सच्या संघात देखील भागीदारी आहे. बिटकॉइन पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीने कुंद्रा यांच्यावर कारवाई केली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये पुण्यातील बंगला आणि इक्विटी शेअर्सचाही समावेश आहे. ईडीने महाराष्ट्र पोलिस आणि दिल्ली पोलीसांतर्फे वन व्हेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड आणि आरोपी दिवंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज आणि इतरांविरुद्ध एफआयआर नोंदवल्यानंतर ईडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. आरोपींनी बिटकॉइन्सच्या रूपात लोकांकडून पैसे गोळा केले होते. व बिटकॉइन्सच्या रूपात दरमहा 10 टक्के रक्कम परत करण्याचे आश्‍वासन दिले असल्याचा आरोप आहे. या मध्यमातून आरोपींनी मोठ्या प्रमाणात रक्कम लुटली असल्याचे तपसात पुढे आले आहे. ईडीच्या तपासात असे समोर आले आहे की, कुंद्रा यांनी युक्रेनमध्ये खाण फार्म उभारण्यासाठी गेन बिटकॉइनचे प्रवर्तक आणि मास्टरमाइंड अमित भारद्वाज यांच्याकडून 285 बिटकॉइन्स घेतले होते. या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.  

नेमके काय आहे घोटाळा ? – ईडीने राज कुंद्रावर बिटकॉईन घोटाळा प्रकरणात ही कारवाई केली आहे. हा घोटाळा जवळपास दोन हजार कोटी रूपयांचा असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणामध्ये ईडीने याआधी 2018 मध्ये समन्स बजावले होते. 2018 मध्ये या बिटकॉईन घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी अमित भारद्वाजला तेव्हा अटक करण्यात आली होती. हा घोटाळा मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. बिटकॉईनच्या एका संकेतस्थळावरून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे या प्रकरणामध्ये म्हटले आहे. हे प्रकरण राज कुंद्राशी संबंधित आहे. त्यामुळेच त्याची संपत्ती ईडीने जप्त केली आहे.  

COMMENTS