Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाटण तालुक्याचा सुपूत्र कमांडो सुरज शेवाळे याने फडकविला 22 हजार फुटांवर तिरंगा

उंच हवेत तिरंगा फडकवताना कमांडो सुरज शेवाळे. पाटण / प्रतिनिधी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पॅरा रेजिमेंटचा कमांडो आणि सातारा जिल्ह्याती

साखराळे युनिटमध्ये प्रतिदिन दीड लाख लिटर इथेनॉल निर्मिती करणार : आ. जयंत पाटील
पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेतून 1119 नवीन वीजजोडण्या

पाटण / प्रतिनिधी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पॅरा रेजिमेंटचा कमांडो आणि सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील चोपदारवाडी गावचा सुपूत्र सूरज शेवाळे याने काश्मीरमध्ये चार्टर्ड विमानातून 22 हजार फूट उंचीवरून उडी घेत हवेत आवकाशात तिरंगा फडकवला. पाटण तालुक्याच्या सुपुत्राची ऐतिहासिक कामगिरी जिल्ह्यासह पाटण तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पॅरा रेजिमेंटचा कमांडो आणि सातार्‍याचा सुपूत्र सूरज शेवाळे याने काश्मीरमध्ये चार्टर्ड विमानातून 22 हजार फूट उंचीवरून उडी घेत हवेत तिरंगा फडकवला.
पाटण तालुक्यातील चोपदरवाडी गावचे सुपुत्र कमांडो सुरज शेवाळे यांनी जम्मू काश्मिर येथे स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवानिमित्त साहसी प्रात्यक्षिक केले. विमानातून आवकाशात झेप घेऊन तिरंगा फडकवला. हि तालुक्याचा अभिमान वाढवणारी गोष्ट आहे. त्याचा हवेत तिरंगा फडकवतानाचा चित्तथरारक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. सूरज हा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील चोपदारवाडी गावचा आहे. सन 2017 मध्ये तो सैन्यात भरती झाला आहे. तो सध्या जम्मू काश्मीरमध्ये कार्यरत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आपण हवेत उंचावरुन उडी घेत तिरंगा फडकवण्याचा निर्धार त्याने केला होता. सुरज याने ध्वज फडकविल्याचे वृत्त वृतवाहिनीवरून प्रसारित झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र झाले. त्याबद्दल त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

COMMENTS