Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जीएसबी गणपतीला 400 कोटींचे विमा संरक्षण

मुंबई : यंदाचा गणेशोत्सव तोंडावर आला असून, गणेशमंडळाकडून जय्यत तयारी सुरू केली आहे. येत्या 7 सप्टेंबर 2024 रोजी गणपत्ती बाप्पा आपल्या घरी विराजमा

अभिनेत्री अमाला पॉलला नाकारला केरळमधील मंदिरात प्रवेश
राज्यातील सिंचन प्रकल्पासह उदंचन जलविद्युत प्रकल्पांची कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – मुख्यमंत्री फडणवीस
साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर लक्ष द्यावे, त्याशिवाय तरणोपाय नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : यंदाचा गणेशोत्सव तोंडावर आला असून, गणेशमंडळाकडून जय्यत तयारी सुरू केली आहे. येत्या 7 सप्टेंबर 2024 रोजी गणपत्ती बाप्पा आपल्या घरी विराजमान होणार आहेत. मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखल्या जाणार्‍या किंग संर्कलच्या जी.एस.बी. गणपती सेवा मंडळाने यावर्षी नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. जी.एस.बी. गणपती सेवा मंडळाने यावर्षी तब्बल 400 कोटी रुपयांचा विमा काढला आहे. गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपर्‍यातून भक्त येत येतात. यामुळे मंडळात होणारी गर्दी आणि गणपती बाप्पाच्या अंगावरील दागिने या सगळ्यांचा विचार करून जी.एस.बी. गणपती सेवा मंडळाने विमा रक्कमेत वाढ केली.

COMMENTS