Homeताज्या बातम्यासंपादकीय

अ‍ॅपलचे थ्रेट अलर्ट

भारतासारख्या विशाल आणि खंडप्राय देशामध्ये विरोधकांच्या गोटात काय चालू आहे, यावर सरकार पाळत ठेवण्याचे दिवस अलीकडच्या काळातील आहेत. भारत स्वातंत्र्

प्रदूषणाची वाढती पातळी
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने…
कठोर कायद्याने अत्याचार थांबेल का ?

भारतासारख्या विशाल आणि खंडप्राय देशामध्ये विरोधकांच्या गोटात काय चालू आहे, यावर सरकार पाळत ठेवण्याचे दिवस अलीकडच्या काळातील आहेत. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तंत्रज्ञानाचा वेगाने प्रसार होण्या बराच कालावधी लागला. त्याचबरोबर 1967 मध्ये देशात प्रभावी विरोधी पक्षनेता नसल्यमुळे सरकारला विरोधकांची भीती वाटली नाही. मात्र इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्याच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा त्यांना विरोध होता. येथूनच आपल्याच मंत्र्यांवर पाळत ठेवण्याची, त्यांच्या बैठकीची गोपनीय माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्यानंतर फोन टॅपिंगचे प्रकार देखील वाढल्याचे समोर आले. त्यानंतर म्हणजेच 2000 नंतर तंत्रज्ञानात कमालीची प्रगती झाली आणि हेरगिरी मोठ्या प्रमाणावर वाढली. त्यामुळे स्पॉय कॅमेेरे, मोबाईलमध्ये सॉफ्टवेअरच्या मदतीने डेटा मिळवणे, यासारखे प्रयोग सुरू झाल्याचे दिसून येत आहे. यानंतर अलीकडच्या काही महिन्यांपूर्वी पेगॉससचे भूत अनेकांच्या मोबाईलमध्ये अवतरल्याचे दिसून आले. याप्रकरणी विरोधकांनी संसदीय समितीद्वारे चौकशी करण्यासाठी जंग-जंग पछाडल्याचे दिसून आले, मात्र तरीही याप्रकरणी सत्य माहिती समोर येऊ शकलेली नाही. त्यानंतर आता अ‍ॅपलचे थे्रट अलर्टने खळबळ उडवून टाकली आहे. अ‍ॅपल कंपनी आपल्या ग्राहकांना सर्वोच्च सुरक्षा प्रदान करण्यासाठी ओळखली जाते. शिवाय अ‍ॅपलचे फोन हॅक करणे सहजा-सहजी शक्य होत नाही. यासाठी अ‍ॅपलने आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आणि प्रायव्हसीसाठी नुकतेच एक फिचर आणले आहे. या फिचरवरती भारतातील अनेक विरोधकांना आणि काही पत्रकारांना नोटीफिकेशन मिळाले. जशी कंपनीला सरकार पुरस्कृत घुसखोरीची माहीती मिळते. तर कंपनी दोन प्रकारे युजरला अलर्ट करते. पहिला थ्रेट नोटिफीकेशन आय मेसेजद्वारे युजरच्या अ‍ॅपल आयडीवर रजिस्टर नंबरला पाठवला जातो. तसेच रजिस्टर ईमेलवरही एक थ्रेट अलर्ट मॅसेज येतो. याशिवाय अ‍ॅपल आयडीवर देखील युजरना एक थ्रेट नोटिफिकेशन मिळतो. परंतू येथे युजरला साईन-इन करावे लागते. त्याच बरोबर कंपनी युजरला एडीशनल स्टेप्स देखील सांगते, ज्यामुळे अकाऊंट सुरक्षित ठेवले जाऊ शकते. कंपनीने काही थ्रेट नोटिफिकेशन चुकीचे देखील असू शकतात असे कंपनीने म्हटले आहे. कोणत्या कारणाने हा थ्रेट नोटीफिकेशन पाठविला आहे याचे कारण कंपनी सांगू शकत नाही. कारण तसे केल्याने भविष्यात युजर्सवर अटॅक सोपा होऊ शकतो. अनेक नेत्यांना असे नोटीफिकेशन आल्यानंतर खळबळ उडाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या प्रियांका चतुर्वेदी, काँग्रेसचे शशी थरूर आणि त्यांच्या पक्षाचे जनसंपर्क विभाग प्रमुख पवन खेडा यांनी या मॅसेजचे स्क्रीनशॉट एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. महुआ मोइत्रा यांनी एक्सवर लिहिले की, सरकार माझा फोन आणि ईमेल हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा अलर्ट मला अ‍ॅपलकडून मिळाला. यासंबंधी ईमेल आणि टेक्स्ट मॅसेज मिळाला आहे. त्यांनी लिहिले की, तुमची भीती पाहून मला दया येते. त्यानंतर या प्रकरणावरून खळबळ उडाली आहे. यानंतर अ‍ॅपलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य प्रायोजित हल्लेखोरांना मोठा निधी मिळत असतो. कालांतराने ते अधिकाधिक अत्याधुनिक होत जातात.अशा हल्ल्यचा शोध धोक्याच्या इंटेलिजन्स सिग्नलवर आधारित असतो. बर्‍याचदा तो चुकीचा आणि अपूर्ण असतो. त्यामुळे हल्ल्याचा इशारा देणारे काही मॅसेज फॉल्स अलार्म देखील असू शकतात. किंवा यातून हल्लेखोरांची ओळख पटणार नाही. असे कंपनीने यातून सुचित केले आहे. त्याचबरोबर कंपनीने पूर्णतः चुकीचे आहेत, असेही म्हटले नाही. याचाच अर्थ या फोनशी छेडछाड करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. देशात पुढील काही महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. अशावेळी सरकार पुरस्कृत कंपन्यांकडून, काही खाजगी संस्थांकडून अशी हेरगिरी करून, त्याची माहिती सरकार, किंवा त्या त्या पक्षाच्या प्रमुखांना पुरवली जाते. त्यातून आगामी रणनीती ठरवण्यास मदत होते.

COMMENTS