Homeताज्या बातम्यासंपादकीय

विजेचा वेग, चित्याची चपळता आणि वाऱ्याचा सळसळाट !

  विजेचा वेग, चित्याची चपळता आणि वाऱ्याचा सळसळाट, असा चित्तवेधक आणि जगातील सर्व प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा, नव्या पिढीला आपल्या वेगवान आयुष्याच

महाराष्ट्र भयमुक्त रहावा !
झारखंड सभागृहातील गूंज !
पठाणी धोबीपछाड ! 

  विजेचा वेग, चित्याची चपळता आणि वाऱ्याचा सळसळाट, असा चित्तवेधक आणि जगातील सर्व प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा, नव्या पिढीला आपल्या वेगवान आयुष्याचे प्रतिबिंब घडवणारा फुटबॉल हा खेळ काल अर्जेंटीनाला जगजेत्ता करून गेला. जगातील कोणत्याही खेळापेक्षा चित्तथरारक आणि लक्षवेधी असणारा फुटबॉल, हा खेळ म्हणजे सळसळत्या तारुण्याचा एक प्रतीक म्हणावा लागेल. काल अर्जेंटीनाचा मेस्सी आणि फ्रान्सच्या एम्बापे या दोघांनी फुटबॉल च्या नव्या पिढीच्या डोळ्याचे पारणे फेडले. कालच्या अंतिम सामन्यात फ्रान्स आणि अर्जेंटिना या दोन तुल्यबळ संघांचा मैदानावर प्रवेश झाला आणि फुटबॉल चे कतार येथील मैदान अक्षरशः गर्दीने फुलून गेले. प्रेक्षकांचा सळसळता उत्साह आणि त्यावर दोन्ही संघांविषयी वाढत्या अपेक्षांनी दोन्ही संघांचे सर्वच खेळाडू अतिशय दबावाखाली होते. जगातली तरुणाईने आपापला संघ फेवर करून गेली महिनाभर फुटबॉल च्या विश्वचषक असणाऱ्या फिफा चे बॅनर लावून अवघ्या विश्वाला फुटबॉल ज्वरात नेले होते. कालचा अंतिम सामना हा फुटबॉलच्या इतिहासात चिरकाल स्मरणात राहील इतका झंझावाती  ठरला आहे. या सामन्यात सुरुवातीच्या अवघ्या १३ मिनिटात अर्जेंटीनाने दोन गोल करून फ्रान्सवर दोन शून्याची आघाडी घेतली. त्यानंतर खेळाच्या ८३ व्या मिनिटापर्यंत म्हणजे पहिला ४५ मिनिटांचा खेळ होऊन त्यानंतर दुसऱ्या हाॅफमध्ये अंतिम क्षणात खेळ पोहोचला होता. म्हणजे ९० मिनिटाच्या या खेळामध्ये दोन्ही हाफ जवळपास संपलेले होते. अवघी सात मिनिटं अर्जेंटिना केवळ टाईमपास म्हणून खेळेल आणि फ्रान्सचा पराभव निश्चित असा डोळ्यासमोर उभा राहिलेला होता. त्यामुळे फ्रान्सच्या चाहत्यांची पूर्णपणे निराशा झाली होती. अशा क्षणी फ्रान्सला मिळालेला पेनल्टी किक आणि त्यानंतर एम्बापे ने दाखवलेली कमाल, यामुळे ८३ व्या मिनिटानंतर पुढच्या दीड मिनिटात फ्रान्सने दोन गोल करून दोन्ही हाफ बरोबरीत सोडवून  मिनिटांचा खेळ पुन्हा पुढे वीस मिनिटे वाढवला. अर्जेंटिना आणि फ्रान्स अंतिम सामन्यातील हे दोन्ही संघ दोन दोन गोलने आता समान पातळीवर आले होते. अशावेळी एक्स्ट्रा २० मिनिटांसाठी खेळ वाढवला गेला. या वीस मिनिटात देखील दोन्ही संघांनी म्हणजे अर्जेंटिनाचा मेस्सी आणि फ्रान्सचा एम्बापे या दोघांनी आपापल्या संघासाठी पुन्हा एक एक गोल केला आणि तीन – तीन च्या  बरोबरीने सोडवत, दोन्ही संघ पुन्हा एक्स्ट्रा वेळेत देखील बरोबरीत राहिल्याने हा सामना अतिशय चित्तथरारक बनला! हा सामना इतका वैशिष्ट्यपूर्ण होता की या सामन्यातील गोल करणारे दोन्ही खेळाडू अर्जेंटिनाचा मेस्सी आणि फ्रांचा थेंबापे हे दोघेही प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहतील अशी उल्लेखनीय कामगिरी त्यांची झाली या दोघांनी आपापल्या संघासाठी गोल करण्याची जबाबदारी आपल्याकडे घेतली. एक्स्ट्रा वेळेनंतरही बरोबरीत सुटलेल्या सामनांमध्ये दोन्ही संघांना पाच – पाच पेनल्टी किक दिल्याने या सामनाचा निकाल लावण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये मेस्सी ने पुन्हा दोन  गोल केले तर एम्बापेने अवघा एक गोल केला आणि  पाच-चार च्या फरकाने या सामन्यात अर्जेंटिनाचा चित्तथरारक विजय साकार झाला. या विजयाबरोबरच अर्जेंटिनाला या विजयासाठी जवळपास ३४७ कोटी रुपयांचा प्रथम पुरस्कार मिळेल तर फ्रान्सला दुसऱ्या क्रमांकाचा २४८ कोटी रुपयांचा पुरस्कार, याबरोबरच उपांत्य आणि उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या प्रत्येक संघाला ११४ कोटी रुपयांचे बक्षीस वाटण्यात आले. या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर जगातला सर्वात श्रीमंत खेळ, सर्वात वेगवान, चित्तथरारक आणि जगातील सर्वाधिक प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा, जगात सर्वाधिक खेळाडू असणारा हा खेळ निश्चितपणे येत्या काळात जगातील तरुणाईच्या मनाचा कब्जा घेणार आहे! मेस्सी च्या जन्माच्या आधी एक वर्ष अर्जेंटिनाने हा जागतिक विश्वकरंडक जिंकला होता. त्यानंतर मिस्सी ने अर्जंटीनाचे हे स्वप्न त्याच्या वयाच्या ३६ व्या वर्षांपूर्वी आणि अर्जेंटिनाने छत्तीस वर्षांपूर्वी जिंकलेल्या विजेतेपदाची पुनरावृत्ती केली!

COMMENTS