Homeताज्या बातम्याअहमदनगर

शेतकर्यांचा कृषि माल निर्यातीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ प्रयत्नशील- कुलगुरु डॉ.पाटील

सध्या महाराष्ट्रामध्ये परदेशातुन शोभीवंत झाडांची रोपे तसेच द्राक्षांसारखी कलमे आयात केली जातात. परदेशातून येणार्या रोपांबरोबर काही परदेशी रोग किंवा क

बुलडाण्यात टिप्पर उलटून 13 मजुरांचा मृत्यू l DAINIK LOKMNTHAN*
पोलीस स्टेशनसमोर गळ्याला ब्लेड लावून आत्महत्येचा प्रयत्न l LokNews24
सीमाभागातील मराठी भाषिकांवरील अन्याय थांबवा : अजित पवार l DAINIK LOKMNTHAN

सध्या महाराष्ट्रामध्ये परदेशातुन शोभीवंत झाडांची रोपे तसेच द्राक्षांसारखी कलमे आयात केली जातात. परदेशातून येणार्या रोपांबरोबर काही परदेशी रोग किंवा किडी भारतात येवू नयेत म्हणून अशी रोपे रोग व किडमुक्त असल्याचे संबंधीत निर्यातदाराने प्रमाणीत करणे बंधनकारक असते. असे असले तरी ज्या ज्या वेळी परदेशातून रोपे/झाडे आयात केली जातात त्या त्या वेळी केंद्र शासनाच्या विभागीय रोप विलगिकरण संस्था समुद्रकिनारी व विमानतळावर कार्यरत असतात. या ठिकाणी आयात केलेली रोपे जरी तपासली तरी ही रोपे पुन्हा ठराविक कालावधीसाठी विभागीय रोप विलगिकरण संस्था यांचे देखरेखीखाली ठेवले जातात. त्यासाठी केंद्रशासनाकडून देशभरातील कृषि विद्यापीठाचे रोगशास्त्र विभागास जबाबदारी दिली आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत नाशिक आणि पुणे विभागात येणार्या रोपांच्या सुविधा व विलगिकरण कालावधीमधील देखरेखीचे जबाबदारी दिली आहे. याबरोबरच आता पश्चिम महाराष्ट्रातील निर्यातक्षम पिके घेणार्या शेतकर्यांना त्यांचा माल निर्यातयोग्य प्रमाणीत करण्यासाठी लागणार्या आरोग्यविषयक (फायटोसॅनिटरी) प्रमाणीकरण प्रक्रियेत सहभाग वाढवून शेतकर्यांना तत्पर सेवा देवून त्यांचा वेळ, श्रम वाचविण्यासाठी पुढाकार घेणार आहे. तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करण्यात येत आहे असे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी सांगितले.  राज्यातील कृषि मालाची निर्यात वाढविण्यासाठी राहुरीचे महात्मा फुले कृषि विद्यापीठ यंदा विशेष प्रयत्न करीत आहे. निर्यातक्षम फळबागा व इतर पिके यांचे निर्यात नोंदणीसाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. या निर्यातीसाठी आवश्यक असणारी वनस्पती आरोग्यविषयक (फायटोसॅनिटरी) प्रमाणपत्र सध्या जिल्ह्याच्या कृषि अधिक्षक कार्यालयामार्फत वितरीत केली जातात. फलोत्पादन व इतर पिके यांच्या निर्यातीला चालना देण्यासाठी राज्याचा फलोत्पादन विभाग व अपेडा यांचे धोरणात्मक निर्णय उपयुक्त ठरत असतात. निर्यातक्षम शेतीमालाची नोंदणी करण्यासाठी कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांनी हॉट नेट ही संगणकीय प्रणाली उपलब्ध करुन दिली आहे. त्यात शेतमाल निर्यातीसाठी नोंदणी करावी लागते. राज्याच्या कृषि विभागाने आता या हॉट नेट प्रणालीमध्ये पीक निहाय नोंदणीचा समावेश जसे आनारनेट, मँगोनेट, व्हेज नेट, सिट्रस नेट इ. समावेश केला आहे. विशेष म्हणजे या प्रणालीचा वापर करतांना सर्वसाधारण ग्रामीण भागातील शेतकरी तसेच कृषि विभागाचे कर्मचारी हे भ्रमणध्वनीच्या आधारे अद्ययावत माहिती भरत असतात. या निर्यात वाढीसाठी अपेडा, राज्य कृषि विभाग तसेच कृषि विद्यापीठे हे दूरदृष्य प्रणालीद्वारे प्रशिक्षणवर्ग ही घेत असतात.  निर्यातक्षम कृषि मालाची नोंदणी वाढविण्यासाठी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विद्यापीठाने मोहिम राबविण्याचे ठरविले आहे. या निर्यात वाढीसाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील तसेच तंत्र अधिकार्यांचे विद्यापीठ सहकार्य घेणार आहे असे डॉ. तानाजी नरुटे यांनी सांगितले तर शेतमाल निर्यातीसाठी क्षेत्र वाढविण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ विशेष प्रयत्न करणार आहे असे विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी मनोदय व्यक्त केला.

COMMENTS