Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिराळा तालुक्यातील चांदोली धरण शनिवारपासून पर्यटकांसाठी खुले

शिराळा / प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील चांदोली धरण शनिवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असल्याची माहिती शाखा अभियंता टि. एस. धामणकर यांनी द

मुक्रमाबाद परिसरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस
कोयना जलाशयातील प्रस्तावित नौकाविहार जागेची गृहराज्य मंत्र्यांकडून पाहणी
पाटण तालुक्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ भातासह सोयाबिनच्या पिकांचे मोठे नुकसान

शिराळा / प्रतिनिधी : शिराळा तालुक्यातील चांदोली धरण शनिवारपासून पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असल्याची माहिती शाखा अभियंता टि. एस. धामणकर यांनी दिली.
चांदोली धरण हे महाराष्ट्रातील दोन नंबरचे मातीचे धरण आहे. चांदोली धरण हे बारमाही हिरवळीने नटलेले असल्यामुळे पर्यटकांचा नेहमी चांदोलीकडे ओढा वाढत आहे. एक नोव्हेंबरला पर्यटकासांठी सुरु होणारे चांदोली धरण पर्यटकांच्या विनंती वरुन धरण प्रशासनाने शनिवारी सकाळपासून चांदोली धरण पर्यटकासांठी खुले केल्याने पर्यटकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. धरण पाहण्यासाठी पर्यटकांना सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत विनामुल्य पास वारणावती येथील शाखा कार्यालयात देण्याची व्यवस्था धरण प्रशासनाने केली आहे. पर्यटकांनी पास काढतेवेळी आधारकार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक दाखवणे गरजेचे आहे. पर्यटकांना सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरण पाहता येऊ शकते.
संपुर्ण धरण परीसर सिसिटीव्ही कमेराच्या कक्षेत आहे. धरणावर दुचाकी, चारचाकी वहानांना जाण्यास बंदी घालणेत आली आहे. पर्यटकांनी धरणाच्या मुख्य गेटवर वाहने थांबवुन धरणावर पायी चालत जावे लागणार आहे. धरण प्रत्येक गुरुवारी पर्यटकांच्यासाठी बंद राहणार आहे. पर्यटकांनी धरणावर गेल्यावर धरणाच्या जलाशयात उतरु नये, असे आदेश धरण प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. तसेच धरण परीसरात फोटो काढणे, व्हिडीओ शुटींग करण्यास मनाई आहे. पर्यटकांनी कोरोना नियमांचे पालन करुन धरण पहावे, असे आवाहन शाखा अभियंता टि. एस. धामणकर यांनी केले आहे.

COMMENTS