Homeताज्या बातम्यादेश

राहुल गांधींनी अटलजींच्या स्मृतीस्थळाला केले अभिवादन

नवी दिल्ली ः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी सकाळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळी भेट देत अभिवादन केले.  राहुल य

राहुल गांधी लोकसभेत पुन्हा परतले
महिला आरक्षणावरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न ः राहुल गांधी
राहुल गांधींचा ट्रकने दिल्ली ते चंदीगढपर्यंतचा प्रवास

नवी दिल्ली ः काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी सकाळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळी भेट देत अभिवादन केले.  राहुल यांच्या अटल समाधीच्या दर्शनानंतर भाजपने म्हटले आहे की, काँग्रेस जर खरोखरच अटलजींचा आदर करत असेल, तर गौरव पांधी यांची पक्षातून हकालपट्टी करावी. तसेच त्यांच्या वक्तव्याबद्दल माफीही मागावी. गौरव पांधी याने अटलजींन जयंतीदिनी ब्रिटिशांचा गुप्तहेर म्हटले होते. गौरव पांधी म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांनी 1942 मध्ये आरएसएसच्या इतर सदस्यांप्रमाणे भारत छोडो आंदोलनावर बहिष्कार टाकला होता. चळवळीत सामील झालेल्यांच्या विरोधात त्यांनी ब्रिटीश मुलभूत म्हणून काम केले. गौरव पांधी हे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे समन्वयक आणि काँग्रेसचे नेते आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दिल्लीत आहे. 24 डिसेंबरच्या रात्रीपासून या यात्रेला 9 दिवसांचा ब्रेक लागला आहे. यावेळी यात्रेत सहभागी असलेले लोक विश्रांती घेतील आणि त्यांच्या कुटुंबीयांना भेटतील. 3 जानेवारीला भारत जोडो यात्रा गाझियाबादमधील लोणी सीमेवरून उत्तर प्रदेशात प्रवेश करेल. यानंतर 4 जानेवारीला बागपतमार्गे, 5 जानेवारीला शामलीमार्गे आणि 6 जानेवारीला कैरानामार्गे राहुलचा प्रवास दुसर्‍या टप्प्यात हरियाणातील सोनीपतमध्ये दाखल होईल. हरियाणानंतर ही यात्रा पंजाबमार्गे जम्मू-काश्मीरला रवाना होईल.

COMMENTS