Homeताज्या बातम्यादेश

उत्तरप्रदेशात आणखी एक एन्काउंटर

तुरुंगातून जामिनावर असलेल्या कुख्यात गुंडाचा खात्मा

लखनौ/वृत्तसंस्था ः उत्तरप्रदेशात एसटीएफसोबत झालेल्या इन्काउंटरमध्ये गँगस्टर अनिल दुजाना याला ठार करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी यूपी सरका

कारमधून आलेल्या टोळक्याकडून उंडाळे येथील युवकाचे अपहरण; कोल्हापूर-सांगलीच्या 10 जणांना अटक; पाच दिवस पोलीस कोठडी
अदानी समूहाला 65 अब्ज डॉलरचा फटका
LokNews24 l देशाच्या लोकशाहीवर प्रधानमंत्री मोदींचा घाला ; मोदींचे फंडे आणि जूमले फक्त निवडणुकीपुरते

लखनौ/वृत्तसंस्था ः उत्तरप्रदेशात एसटीएफसोबत झालेल्या इन्काउंटरमध्ये गँगस्टर अनिल दुजाना याला ठार करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी यूपी सरकारच्या कार्यालयातून यूपीच्या टॉप 65 माफियांची यादी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये ग्रेटर नोएडातील अनिल दुजाना यांचेही नाव होते. कुख्यात गँगस्टर अनिल दुजाना दिल्लीच्या तिहार तुरुंगात बराच काळ बंद होता, मात्र काही काळापूर्वी तो जामिनावर बाहेर आला होता.
तुरुंगातून बाहेर येताच अनिल दुजाना याने संगीता, त्याची पत्नी आणि जयचंद प्रधान हत्या प्रकरणातील साक्षीदार यांना धमकावले होते. यानंतर वरिष्ठ अधिकार्‍यांनी कारवाई करत गेल्या आठवड्यात अनिल दुजाना याच्यावर2 गुन्हे दाखल केले. नोएडा पोलिसांची स्पेशल सेल टीम आणि एसटीएफची टीम दुजानाला पकडण्यासाठी मोहिम सुरू केली होती. गेल्या काही दिवसांपासून 7 टीम सातत्याने 20 हून अधिक ठिकाणी छापेमारी करत असल्याचे सांगण्यात आले होते. अनिल दुजाना यांच्यावर यूपीसह इतर राज्यांमध्ये सुमारे 50 खून, खंडणी इत्यादी गुन्हे दाखल आहेत. बदलपूरचे दुजाना गाव एकेकाळी कुप्रसिद्ध सुंदर नागर उर्फ सुंदर डाकूच्या नावाने ओळखले जात होते. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात दिल्ली-एनसीआरमध्ये सुंदरची भीती होती. त्याने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. अनिल नागर उर्फ अनिल दुजाना हा याच दुजाना गावचा आहे. पोलिस रेकॉर्डमध्ये त्याच्याविरोधात 2002 मध्ये, हरबीर पहेलवानच्या हत्येचा पहिला गुन्हा गाझियाबादमधील कवी नगर पोलिस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता.

COMMENTS