Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाचे विद्यार्थी सारथी निबंध स्पर्धेत प्रथम

सोनई/प्रतिनिधी - छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांचे वतीने शाहू महाराज ’स्मृती’ शताब्दी वर्षा निमित्ताने शासकीय

पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार नगरपालिका निवडणूक लढवणार : सागर राठोड
कुस्तीपटू सोनाली मंडलिकला सुवर्णपदक
भाजपात प्रवेश केल्यावर ते साधु संत होतात का? शेट्टी

सोनई/प्रतिनिधी – छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था पुणे यांचे वतीने शाहू महाराज ’स्मृती’ शताब्दी वर्षा निमित्ताने शासकीय परिपत्रकान्वये नेवासा पंचायत समितीने तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते.या स्पर्धेसाठी तालुक्यातून प्राथमिक व माध्यमिक विद्यालय यांनी सहभाग घेतला होता. केंद्रस्तरावरून आलेल्या निबंधाचे योग्य ते मूल्यमापन करून यातून दोनही गटातून एक ते दहा क्रमांक काढण्यात आले.


यामध्ये मुळा एज्युकेशन सोसायटी सोनईच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक विद्यालय मुळा कारखाना या विद्यालयातील दोन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्यामध्ये लहान गट लोडे सोहम सुरेश इयत्ता पाचवी प्रथम क्रमांक व मोठा गट कु.आढाव तनुजा विठ्ठल इयत्ता दहावी प्रथम क्रमांक मिळवला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुळा एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे उपाध्यक्ष उदयनदादा गडाख व सचिव लोंढे. यु.एम सर,प्रशासन अधिकारी डॉ. अशोक तूवर यांनी अभिनंदन केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल विद्यालयाने आज पालकांचा व यशस्वी विद्यार्थ्यांचा सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी अभिनंदन करून सन्मान केला या कार्यक्रमाचे प्रस्ताविक आप्पासाहेब शेटे यांनी केले विद्यार्थी पालक विठ्ठल पाटील आढाव सुरेश पाटील लोडे यांनी विद्यार्थ्यांचा व पालकांचा सन्मान केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.              
             ज्येष्ठ अध्यापिका श्रीमती जाधव यांनीही यावेळेस मनोगत व्यक्त करून या विद्यार्थ्यांना शाबासकी देऊन त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक एस.एम.लोंढे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, तालुका पातळीवर आपल्या विद्यालयातील या दोन्हीही विद्यार्थ्यांनी दोन गटातून प्रथम क्रमांक मिळवला हे विद्यालयाचे घवघवीत यश आहे. या विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव उत्तम असल्यामुळे त्यांना हे यश मिळाले इतर विद्यार्थ्यांनीही त्यांचे अनुकरण करून सहशालेय उपक्रमात सहभागी होण्याचा प्रयत्न करावा. या कार्यक्रमास शिक्षक शेख, पंडित, शिंदे, शेटे, श्रीमती चोथे गवळी, व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मराठी विषय अध्यापक पटारे, व आढाव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबासाहेब पटारे यांनी केले व आभार श्रीमती लवांडे यांनी मानले.

COMMENTS