Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीमध्ये दोन गट नाहीत

शरद पवारांचा निवडणूक आयोगाकडे दावा

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने सत्तेत सहभागी होण्यास पसंदी दिली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग

शरद पवारांचा राजीनामा म्हणजे घरगुती तमाशा
बंडखोरांनी माझा फोटो वापरू नये
शरद पवारांना नागालँडमध्येही धक्का

मुंबई/प्रतिनिधी ः राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये उभी फूट पडल्यानंतर अजित पवार गटाने सत्तेत सहभागी होण्यास पसंदी दिली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मात्र आपण महाविकास आघाडीसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र अजित पवारांनी आपणच पक्षाचा अध्यक्ष असल्याचा दावा करत, पक्षावर दावा ठोकला होता, त्यानंतर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांना नोटीस आली होती. त्या नोटीसीला उत्तर देतांना शरद पवारांनी राष्ट्रवादीमध्ये दोन गट नसल्याचे म्हटले आहे. त्यांच्या दाव्यामुळे निवडणूक विश्‍लेषकांच्या भुवया उंचावल्यात.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने नुकतेच निवडणूक आयोगाला एक पत्र पाठवले होते. त्यात राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची निवड करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. या पत्रावर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला पत्र पाठवून आपली बाजू स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, पवारांनी पाठवलेल्या आपल्या उत्तरात आपल्या पक्षात कोणतेही गटतट नसल्याचा दावा केला आहे. शरद पवारांच्या गटाने निवडणूक आयोगापुढे म्हटले आहे की, अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर दावा ठोकणे अकाली व दुर्दैवी आहे. ही मागणी आयोगाने फेटाळली पाहिजे. यासाठी या गटाने पक्षात कोणतेही गटतट नसल्याचा तर्क मांडला आहे. अजित पवार यांच्या याचिकेतून राष्ट्रवादीत 2 उभे गट पडल्याचे कोणतेही पुरावे नाहीत. राष्ट्रवादीत कोणता वाद आहे हे सिद्ध करण्यास अजित पवार सकृतदर्शनी सक्षम नाहीत. प्रथम दर्शनी निवडणूक आयोगानेही राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षात व अजित पवार यांच्या गटात वाद असल्याचे सिद्ध केले नाही. एवढेच नाही तर 1 जुलै 2023 पूर्वी अजित पवारांनी शरद पवार अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाविरोधात कोणतीही तक्रार केली नव्हती. तसेच शरद पवार किंवा पक्षाच्या अन्य कोणत्याही नेत्यांच्या बैठकीत त्यांनी विरोधही केला नव्हता, अशी बाब शरद पवार यांच्या गटाने निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वाचा लढा शिवसेनेच्या मार्गाने जात आहे. शिवसेनेसारखाच अजित पवार यांनी पक्षावर दावा सांगितला आहे. राष्ट्रवादीचे बहुतांश आमदार अजित पवारांच्या गोटात आहेत. त्यामुळे त्यांच्याच गटाला पक्षाचे नाव व चिन्ह देण्यात यावे, असे त्यांचे म्हणणे आहे. विशेषतः 30 जून 2023 रोजी झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष म्हणून अजित पवारांची निवड करण्यात आल्याचा दावा अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे केला होता. यासंबंधीच्या पत्रावर पक्षातील बहुतांश सदस्यांनी स्वाक्षर्‍या केल्या होत्या.

COMMENTS