मस्जिदीत नमाज पठणावर रमजान काळात बंदी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मस्जिदीत नमाज पठणावर रमजान काळात बंदी

गेल्यावर्षीप्रमाणे या वर्षीही मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्यावर कोरोनामुळे करण्यात येणार्‍या टाळेबंदीचे सावट आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ते साधन सुविधा आस्थापना विभागाच्या जिल्हा संघटकपदी दीपक परदेशी यांची नियुक्ती 
कोल्हे यांनी स्वतःच्याच नगरसेवकांना फसवून-अंधारात ठेवून माझ्याकडे अर्ज दिला-नगराध्यक्ष वहाडणे
LOK News 24 । ‘फक्त हिंदू सणांनाच ठाकरे सरकारची आडकाठी का

अहमदनगर/प्रतिनिधीः गेल्यावर्षीप्रमाणे या वर्षीही मुस्लिम बांधवांच्या रमजान महिन्यावर कोरोनामुळे करण्यात येणार्‍या टाळेबंदीचे सावट आहे. आज चंद्रदर्शन झाले तर उद्यापासून (14 एप्रिल) एक महिन्याच्या उपवासांना सुरुवात होणार आहे. सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नमाजाला तसेच मस्जिदीत जाऊन नमाज पठण करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. धार्मिकस्थळी अगर रस्त्यावर गर्दी न करता घरातच सण साजरा करण्याच्या सूचना मार्गदर्शक तत्वाद्वारे करण्यात आल्या आहेत. 

समजान महिन्यात उपवासासोबत विविध धार्मिक कार्यक्रमही असतात; मात्र या वर्षीही ते गर्दी टाळून करण्याच्या सूचना सरकारतर्फे करण्यात आल्या आहेत. रमजान महिन्यात मुस्लिम समाजामध्ये मोठ्या संख्येने मशिदीमध्ये जाऊन सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. या कालावधीत मुस्लिम बांधव नमाज, तरावीह व इफ्तारसाठी एकत्र येतात. राज्यात सुरू असलेला कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता दक्षता घेण्याची अवश्यकता असल्याने या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

मुस्लिम बांधवांनी नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इफ्तारसाठी मस्जिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरातच साजरे करावेत, सार्वजनिक ठिकाणी एकावेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, महिन्याच्या शेवटच्या शुक्रवारी दुवा पठण (अलविदा जुम्मा) करण्याची प्रथा आहे. त्यासाठी मुस्लिम बांधव मोठया प्रमाणात मस्जिदीमध्ये येऊन दुवा पठण करतात; परंतु या वेळी कोणीही मस्जिदीमध्ये दुवा पठणाकरीता एकत्र जमू नये. आपापल्या घरातच दुवा पठण करावे, असे या मार्गदर्शक सूचनांत म्हटले आहे. शब-ए-कदर ही पवित्र रात्र रमजान महिन्याच्या 26 व्या दिवशी साजरी करण्याची प्रथा आहे. या निमित्ताने मुस्लिम बांधव तरावीह नमाज संपल्यानंतर आपल्या विभागातील मस्जिदीमध्ये रात्रभर कुराण पठण व नफील नमाज अदा करतात; परंतु या वर्षी सर्व मुस्लिम बांधवांनी धार्मिक कार्यक्रम आपापल्या घरात राहूनच करावेत, असे आवाहनव करण्यौत आले आहे. 

गर्दी टाळण्यासाठी सूचना

*बाजारामध्ये गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये.

* धार्मिक स्थळे बंद असल्याने सर्व कार्यक्रमांचे आयोजन शक्यतो ऑनलाईन पद्धतीने करावे.

*रात्रीची संचारबंदी असल्यामुळे फेरीवाल्यांनी रस्त्यावर स्टॉल लावू नयेत.

*कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करू नये.

* मुस्लिम समाजातील धर्मगुरु, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून रमजान महिना साधेपणाने साजरा करण्याच्या अनुषंगाने जनजागृती करावी.

COMMENTS