Homeताज्या बातम्या

तरुण पिढीला घाबरवून गप्प बसवता येणार नाहीखासदार राहुल गांधींचा केंद्र सरकारवर घणाघात

नवी दिल्ली : परीक्षा प्रश्‍नपत्रिका गैरव्यवहार रोखण्यासाठीच्या कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्त्या आणि विद्यार्थी आंदोलनांवरील पोलिस कारवाईच्या प

संसदेत राहुल गांधींचा अमित शाहांवर गंभीर आरोप
पवनराजे हत्याकांडप्रकरणी सीबीआय हायकोर्टात जाणारउपमुख्यमंत्री शिंदेंनी केली गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा
देशात संविधान  उरले नाही : खा. राऊत
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या एकाच वक्तव्याने लोकसभेतील वातावरण तापले; 'इडियट अन् अंधभक्त' शब्दांवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने, सभागृहात ...


नवी दिल्ली : परीक्षा प्रश्‍नपत्रिका गैरव्यवहार रोखण्यासाठीच्या कायद्यात करण्यात आलेल्या दुरुस्त्या आणि विद्यार्थी आंदोलनांवरील पोलिस कारवाईच्या पार्श्‍वभूमीवर देशातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते खा. राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार टीका करत, देशातील तरुण पिढीला दडपून शांत बसविण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचे म्हटले.
खा. राहुल गांधी यांनी समाजमाध्यमावरील आपल्या संदेशातून केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. विद्यार्थी आंदोलनांमध्ये सहभागी होणार्‍या युवकांना धमकावले जात असल्याचा, त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले जात असल्याचा आणि त्यांच्या समाजमाध्यमांवरील खात्यांवर निर्बंध आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी तरुण पिढीला घाबरवून गप्प बसविण्याचा प्रयत्न करू नये. विद्यार्थ्यांवर लाठीमार, गुन्हे दाखल करणे आणि त्यांचे समाजमाध्यमांवरील अस्तित्व मर्यादित करण्याचे प्रयत्न लोकशाहीला साजेसे नाहीत. राहुल गांधी यांची ही प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर प्रसिद्ध केलेल्या दृक्संदेशानंतर समोर आली. त्याचवेळी संसदेने ‘लोक परीक्षा (अनुचित साधनांचा प्रतिबंध) दुरुस्ती विधेयक, 2026’ मंजूर केले आहे. या दुरुस्तीमुळे प्रश्‍नपत्रिका गैरव्यवहारासंबंधीच्या विद्यमान कायद्यात अधिक कठोर तरतुदी करण्यात आल्या असून, दोषी आढळणार्‍यांविरुद्ध कडक शिक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यसभेत विरोधी सदस्यांनी सभात्याग केल्यानंतर हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले. अलीकडे वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या प्रश्‍नपत्रिका गैरव्यवहाराच्या प्रकरणानंतर देशभरातील अनेक विद्यार्थी आणि तरुण मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. 20 जुलै रोजी नवी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी हस्तक्षेप करून कारवाई केली होती.

COMMENTS