Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गोदामाई प्रतिष्ठानचे कार्य युवकांसाठी कौतुकास्पद ः माजी मंत्री ढाकणे

कोपरगाव प्रतिनिधी ः गेली सव्वादोनशे आठवड्यापासून गोदावरी नदीपात्र स्वच्छता करणारे कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे.असे गौर

बेल्हेकर तंत्रनिकेतनमध्ये प्रथम व द्वितीय वर्षासाठी प्रवेश
नगरला लस नसल्याने लसीकरणाला मिळाली सुट्टी
बिलाच्या कारणावरून डॉक्टरांनी केली रुग्णाच्या नातेवाईकास मारहाण

कोपरगाव प्रतिनिधी ः गेली सव्वादोनशे आठवड्यापासून गोदावरी नदीपात्र स्वच्छता करणारे कोपरगाव येथील गोदामाई प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद आहे.असे गौरवोद्गगार माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे यांनी काढले.
माजी केंद्रीयमंत्री बबनराव ढाकणे यांनी नुकतीच कोपरगाव येथील के.जे.सोमैय्या महाविद्यालयात एका कार्यक्रमास आले होते. याप्रसंगी आवर्जून गोदामाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे व गोदामाई सेवकांची भेट घेत व्यक्त करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, आजकालची अनेक युवा हे मोबाईलच्या युगात ऑनलाइन कामकाजात हरवून गेली आहे. त्यांना आसपासच्या सामाजिक गोष्टीचा पूर्णपणे विसर पडला असतांना, गेल्या 227 आठवड्यापासून कोपरगाव शहरातून वाहणार्‍या पवित्र अशा गोदावरी नदीपात्राची सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ ढाकणे हे प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते चिन्मय उदगीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या गोदामाई प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोमनाथ पाटील, प्रज्वल ढाकणे, साहिल पंडोरे, निखिल दिवटे, समाधान कांदे, वैष्णवी ढाकणेसह समाजकार्य करीत आहे. तसेच नाशिक शहरातील गोदावरी किनार्‍यांची गोदामाई प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्ष सृष्टी देव व टीम तसेच इतरही युवा गोदामाईसेवक यांच्या सहकार्याने गोदावरी नदी किनारे व पात्र स्वच्छता करण्याचे काम अविरतपणे करत आहे. हे काम नक्कीच आजकालच्या युवकांना प्रेरणादायी असल्याचे माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे यांनी सांगितले. या प्रसंगी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, विश्‍वस्त संदीप रोहमारे आदी सह मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS