Homeताज्या बातम्या

वाघ परिवाराचा नवीन वास्तूत गृहप्रवेश उत्साहात संपन्न; यशराज ड्रीम सिटीमध्ये आनंदाचे वातावरण

औरंगाबाद : जिल्ह्यातील सावंगी परिसरातील 'यशराज ड्रीम सिटी' येथे संतोष वाघ यांनी आपल्या परिवारासह नवीन वास्तूत गृहप्रवेश मोठ्या उत्साहात आणि आनंदम

मुंबईत बेस्टच्या बेमुदत संपाची हाक; २३ हजार कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर; ऐन सकाळी मुंबईकरांचे प्रचंड हाल!
‘एसआरआर’ हा निवडणूक आयोगाचा अधिकार; सर्वोच्च न्यायालयाने ठरवले वैध, बिहारमधील मतदार याद्या ठरल्या वैध
भीमाशंकर मंदिरात ‘व्हीआयपी’ दर्शन कायमचे बंद; भाविकांसाठी ऑनलाईन पूर्वनोंदणी अनिवार्य, प्रशासनाचा मोठा निर्णय

औरंगाबाद : जिल्ह्यातील सावंगी परिसरातील ‘यशराज ड्रीम सिटी’ येथे संतोष वाघ यांनी आपल्या परिवारासह नवीन वास्तूत गृहप्रवेश मोठ्या उत्साहात आणि आनंदमय वातावरणात केला.

या निमित्ताने नूतन वास्तूमध्ये विविध धार्मिक विधी आणि गृहप्रवेश पूजा करून घराचा शुभारंभ करण्यात आला. नव्या घरात प्रवेश करताना वाघ कुटुंबीयांमध्ये कमालीचा उत्साह आणि आनंदाचे वातावरण दिसून आले.

या मंगलप्रसंगी संतोष वाघ यांचे चिरंजीव निखिल वाघ यांचे मित्र केशव खोटे पाटील, अंशूल शिंदे पाटील तसेच वासेख युसूफ शेख यांनी विशेष उपस्थिती लावली होती. मान्यवरांनी संतोष वाघ व निखिल वाघ यांना पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या नव्या वास्तूतील सुख, समृद्धी व यशासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. या सोहळ्यामुळे यशराज ड्रीम सिटी परिसरातही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

COMMENTS