Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगावात दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाहणी सुरू करा

आ.आशुतोष काळेंचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

कोपरगांव /प्रतिनिधी ः कोपरगावात मागील 25 दिवसांपासून पाऊस झालेला नसल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात दुष्का

 कालव्या लगतच्या रोहीत्रांचा वीजपुरवठा सुरु करा
कोपरगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा
उर्वरित शेतकर्‍यांना तातडीने अग्रीम पिकविम्याची रक्कम द्या

कोपरगांव /प्रतिनिधी ः कोपरगावात मागील 25 दिवसांपासून पाऊस झालेला नसल्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघात दुष्काळजन्य परिस्थिती असून कोपरगाव मतदारसंघात दुष्काळ जाहीर करण्यासाठी तातडीने पाहणी सुरू करावी. अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोपरगाव मतदारसंघात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर कोपरगाव मतदार संघामध्ये दुष्काळ जाहीर करण्यासाठी पाहणी करण्यात यावी. त्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी सोमवार (दि.21) रोजी जिल्हाधिकारी डॉ.सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेवून त्यांना पाऊस नसल्यामुळे मतदारसंघात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची माहिती देवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात  म्हटले आहे की, कोपरगाव मतदारसंघ पर्जन्य छायेखाली येत असल्यामुळे कोपरगाव मतदारसंघात दरवर्षी पर्जन्यमान जेमतेमच असते. मात्र यावर्षी मतदारसंघात अत्यंत कमी पाऊस पडला असून, मागील अनेक दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली असल्यामुळे खरिपाची सर्वच पिके जळून चालली आहेत. ऐन पावसाळ्यात विहिरींनी देखील तळ गाठला असून जनावरांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे कोपरगाव मतदारसंघात सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती आहे. दुष्काळ जाहीर करण्यासाठी लवकरात लवकर पाहणी करावी. कोपरगाव विधानसभा मतदारसंघात प्रत्येक मंडलामध्ये एकच पर्जन्यमापक केंद्र आहे. या हवामान केंद्रात झालेल्या पर्जन्यमानाच्या नोंदीनुसार शेतकर्‍यांची नुकसान भरपाई अवलंबून असून अचूक पर्जन्यमानाची नोंद होवून शेतकर्‍यांना झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी. यासाठी मतदारसंघात पर्जन्यमापक यंत्रांची संख्या वाढविण्याची मागणी केली आहे. विमा काढलेल्या सर्वच शेतकर्‍यांना सरसकट विम्याचा लाभ द्यावा अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी जिल्हा विमा प्रतिनिधी पंकज रोहोम यांच्याकडे केली आहे.यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक सुधाकर बोराळे, अपर तहसीलदार विकास गंबरे, तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे आदी उपस्थित होते.

COMMENTS