नाशिक रेल्वे स्थानकावर बर्निंग रेल्वेचा थरार

Homeताज्या बातम्या

नाशिक रेल्वे स्थानकावर बर्निंग रेल्वेचा थरार

नाशकात हावडा मेलच्या बोगीला भीषण आग

नाशिक प्रतिनिधी - नाशिक(Nashik) मध्ये हावडा मेलच्या बोगीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. नाशिकरोड  रेल्वे स्थानकावरील मालधक्क्याजवळ हावडा मेलच्य

ओव्हरटेक करण्याच्या नादात बाईकस्वार थेट कारला जाऊन आदळला.
राष्ट्रीय शुटिंग बॉल स्पर्धेसाठी देवळातील प्रज्ञा आणि प्रगतीची निवड
दीपाली चव्हाण प्रकरणाचा तपास महिला आयपीएस अधिकाऱ्यांमार्फत करा : प्रविण दरेकर

नाशिक प्रतिनिधी – नाशिक(Nashik) मध्ये हावडा मेलच्या बोगीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. नाशिकरोड  रेल्वे स्थानकावरील मालधक्क्याजवळ हावडा मेलच्या बोगीला अचानक आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे स्टेशन परिसरात गोंधळ उडाला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. अचानक आग लागल्याने रेल्वे स्थानकावरील प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. बोगीला आग लागल्यामुळे स्थानकावर धुराचे लोट पाहण्यास मिळत आहे. दरम्यान, या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती समोर येत आहे.

COMMENTS