एसटी संपाचा तिढा सुटता सुटेना

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटी संपाचा तिढा सुटता सुटेना

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून, सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांचा संप अजूनही सुटण्याची चिन्हे नाहीत. सोमवारी राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवा

’काश्मीर फाईल्स’ला परवानगी नको होती : शरद पवार
निघोज येथील मंगल कार्यालय नियम मोडल्याने सील LokNews24
उस्माननगर परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनेक ठिकाणी अभिवादन

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून, सुरू असलेला एसटी कर्मचार्‍यांचा संप अजूनही सुटण्याची चिन्हे नाहीत. सोमवारी राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्यात तब्बल साडेचार तास बैठक झाली. या बैठकीत एसटी कर्मचार्‍यांच्या संपावर तोडगा काढण्यावर चर्चा झाली, मात्र यातून अजुनही कोणता तोडगा निघू न शकल्यामुळे एसटीच्या संपाचा तिढा कायम आहे.
यावर अधिक माहिती देताना परिवहनमंत्री अनिल परब म्हणाले की, एसटी कर्मचार्‍यांच्या संपाबाबत चर्चा झाली असून, अजूनही निर्णय झालेला नाही. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी दिवाळीच्या आधीपासून एसटी कामगार संपावर गेले आहेत. उच्च न्यायालयाने मनाई आदेश काढल्यानंतरही संप सुरूच आहे. विलिनीकरणाच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने समितीही स्थापन केली आहे. या समितीचा निर्णय सरकारला मान्य असेल, असं परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र, कामगारांनी समितीवरही अविश्‍वास दाखवला आहे. त्यामुळे संपाचा तिढा कायम आहे. सरकार विलिनीकरणाची घोषणा करत नाही तोवर मागे न हटण्याची भूमिका कामगारांनी घेतली आहे. तर, सरकारने कामगारांना कामावर परतण्याचे आवाहन केले आहे व कारवाईचा बडगाही उगारला आहे. तरीही कामगार निर्णयावर ठाम आहेत. या पार्श्‍वभूमीवर आज पवार व परब यांच्यात चर्चा झाली. या बैठकीतील चर्चेची माहिती परब यांनी दिली. पवार साहेबांनी सरकारकडून होत असलेल्या प्रयत्नांची माहिती घेतली. कामगारांच्या मागण्यांवर कोणते पर्याय असू शकतात व त्यांचे समाधान कसे होऊ शकते, न्यायालयाच्या निर्देशानुसार नेमण्यात आलेल्या समितीसमोर राज्य सरकारनं काय बाजू मांडायला हवी, यावर बैठकीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. एसटीचे उत्पन्न वाढवण्यावर भर देण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेणार आहे. मात्र, कोणताही निर्णय लगेच घेणे शक्य नाही, असे अनिल परब यांनी यावेळी सांगितले. विलिनीकरणाच्या मुद्दा हा उच्च न्यायालयासमोर आहे. त्याबाबत समिती नेमण्यात आली आहे. समितीच्या अहवालानुसार न्यायालय जो निर्णय देईल, तो स्वीकारला जाईल. संप लवकरात लवकर मिटावा असे आमचे प्रयत्न आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या उपायांवर चर्चा झाली. कर्मचार्‍यांबरोबर एसटीचंही नुकसान होत असून लोकांचेही प्रचंड हाल होत आहेत, असे अनिल परब यांनी सांगितले.

तोपर्यंत ‘लालपरी’चे चाक फिरणार नाही ः पडळकर
आझाद मैदानावरील आंदोलनाचा आज 13 वा दिलस आहे. तरीही कुठला निर्णय होत नाही म्हणल्यावर हे सरकार किती असंवेदनशील आहे हे स्पष्ट होते, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांशी संबंधित हा विषय आहे. असे असतानाही साधी बैठक घ्यायला पवारांना 25 दिवस लागले. या बैठकीतही कुठला निर्णय नाही. त्यावरुन हे निर्णयक्षम सरकार नाही, त्यांच्यात एकमत नसल्याचे स्पष्ट होते, अशी खोचक टीका ही त्यांनी केली. तसेच विलीनीकरणाचा निर्णय जोपर्यंत सरकार घेत नाही, तोपर्यंत लालपरीचे चाक फिरणार नसल्याचा इशारा ही त्यांनी यावेळी दिला.

COMMENTS