Homeताज्या बातम्याक्रीडा

दिल्ली-कोलकाता सामना पाहण्यासाठी पोहचले ऍपलचे सीईओ टीम कुक

दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. दरम्यान, अॅपलचे सीईओ टिम कुक बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आन

युवकास जीवदान देणार्‍या तीन साहसी युवकांचा सत्कार
फलटण तालुक्यात बैलगाड्यांच्या शर्यतीचा ट्रॅक पोलिसांकडून जमिनदोस्त
शिराळा तालुक्यातील चांदोली धरण शनिवारपासून पर्यटकांसाठी खुले

दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे. दरम्यान, अॅपलचे सीईओ टिम कुक बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्यासोबत दिल्लीत आयपीएल मॅच पाहताना दिसले. भारतातील दुसऱ्या अॅपल स्टोअरचे उद्घाटन केल्यानंतर, टीम कुक IPL सामन्याचा आनंद घेताना दिसले. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ शेवटच्या स्थानावर आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही संघांना हा सामना जिंकून आपली स्थिती सुधारायची आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत होत आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा पती आनंद आहुजा यांच्यासोबत दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना पाहण्यासाठी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियममध्ये दाखल झाले. यावेळी ते दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या इतर मान्यवर आणि अधिकाऱ्यांसह व्हीआयपी बॉक्समध्ये बसले होते.तसेच, कुक यांनी दिल्लीतील सिलेक्ट सिटीवॉक शॉपिंग मॉलमध्ये भारतातील दुसरे अॅपल स्टोअर लॉन्च केले. दिल्ली कार्यक्रमापूर्वी, कुक यांनी मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये भारतातील पहिले अॅपल स्टोअर लॉन्च केले होते. भारतात आता अॅपलचे दोन स्टोअर्स आहेत. त्याचबरोबर, आपल्या भेटीदरम्यान, कुक यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांची दक्षिण मुंबईतील अँटिलिया येथील निवासस्थानी भेट घेतली आणि नंतर नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेट घेतली. स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी सर्वात वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेपैकी एक असलेल्या भारतीय बाजारपेठेतील आपले स्थान मजबूत करण्यासाठी अॅपलची एक महत्त्वाची वाटचाल म्हणून कुक यांच्या भेटीला पाहिले जात आहे

COMMENTS