Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रध्दा श्रीरामेची राज्यस्तरीय निवड

लातूर प्रतिनिधी - चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककात प्रविष्ट असलेली व्दितीय वर्षाची स्वयंसेविका श्रध्दा दिलीप श्री

बालाजी रोहिलावार यांच्या देशी- विदेशी दारूच्या दुकानाची राज्य उत्पादन विभागाकडे तक्रार
तिरुका येथील संपादित जमिनीवर महामार्गाचे काम सुरू
खुतमापुर येथील मनोज पाटील  यांची पोस्टल असिस्टंट पदावर नियुक्ती

लातूर प्रतिनिधी – चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना एककात प्रविष्ट असलेली व्दितीय वर्षाची स्वयंसेविका श्रध्दा दिलीप श्रीरामे हिची राज्यस्तरीय युवा संसदमध्ये खासदार म्हणून निवड झाली. निवड झाल्यानंतर श्रध्दाने आता युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री पदाकरिता अर्ज दाखल केला आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमधून एकूण आठ स्वयंसेवकांची खासदार म्हणून निवड झाली आहे. दिनांक 18 एप्रिल रोजी राज्यस्तरीय युवा संसदेतील खासदार व निवडून आलेली मंत्री मुंबई विधानसभेला भेट देणार आहेत व एकूणच विधानसभेचे कामकाज उपस्थित मंत्रिमंडळात सोबत अनुभवणार आहेत श्रध्दाच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. उध्दव भोसले, प्र. कुलगुरु डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, रा.से.यो. संचालक डॉ. मल्लिकार्जुन करजगी, संस्थेचे सचिव श्री. भिमाशंकर देवणीकर, विश्वस्थ मठपती गुरूजी, हालकुडे अप्पा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय थोंटे, प्राचार्य डॉ. ओमप्रकाश भुसनुरे, डॉ. शिवराज नागोबा, डॉ. अनंत देशपांडे, रा.से.यो. समन्वयक प्रा. महेश मानके, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कैतुक केले.

COMMENTS