संगमनेर गोवंश कत्तलखाना कारवाई प्रकरण; प्रांत कचेरीसमोर ठिय्या आंदोलन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेर गोवंश कत्तलखाना कारवाई प्रकरण; प्रांत कचेरीसमोर ठिय्या आंदोलन

संगमनेर प्रतिनिधी संगमनेरात गोवंश कत्तलखाना कारवाईनंतर सात दिवस उलटूनही दोषी भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही त्यामुळे आज मंगळवार दि.१२

संगमनेर शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट (Video)
Sangamner : तिसरी लाट थांबवायची असेल तर प्रत्येकाने लसीकरण करणे आवश्यक (Video)
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढविणे गरजेचे- रणजीतसिंह डिसले

संगमनेर प्रतिनिधी

संगमनेरात गोवंश कत्तलखाना कारवाईनंतर सात दिवस उलटूनही दोषी भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही त्यामुळे आज मंगळवार दि.१२ रोजी हिंदुत्ववादी संघटना पुन्हा एकदा आक्रमक झालेले बघायला मिळाले.

दुपारी प्रांत कचेरीसमोर हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते एकत्र येत ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली.

गांधी जयंती दिवशी संगमनेर शहरात अवैध गोवंश कत्तलखान्यांवर झालेल्या कारवाईत पाच कत्तलखान्यांमधून जवळपास ६२ लाख रुपयांच्या ३१ हजार किलो गोवंशाच्या मांसासह १ कोटी ४ लाख ५० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. 

श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नैतृत्वाखाली संगमनेरात एवढी मोठी कारवाई झाल्यामुळे नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविरोधात मोठा असंतोष निर्माण झाला. परिणामी सोमवार दि.४ रोजी संगमनेर प्रांत कार्यालयासमोर शेकडो सामाजिक व हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन केले. 

यावेळी शहरातील अवैध गोवंश व्यवसाय करणाऱ्यांना राजकीय आश्रय मिळत असून नगरपालिका आणि पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. तसेच या व्यवसायात असलेल्या सराहीत गुन्हेगारांची नोंद घेऊन त्यांच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. 

यावेळी श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करत पुढील सात दिवसांत चौकशी करुन दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु अद्यापपर्यंत या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आज हिंदुत्ववादी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. आता वरिष्ठ पोलीस अधिकारी यावर काय पाऊल उचलतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

COMMENTS