Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 हुल्लडबाजी करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यात येतील – पोलिस आयुक्त

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी - होळीनिमित्त नागरिकांमध्ये मोठ्या उत्साहाचा वातावरण बघायला मिळते. यानिमित्ताने काही तरुण होळीच्या दिवशी नशा

एमआयडीसीत कोट्यवधींचा घोटाळा झाला असल्याचा खा.इम्तियाज जलिल यांचा आरोप.
हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली दंडुका मोर्चाचे आयोजन
विधवा भगिनींनीसाठी मदत आराखडा तयार करण्याचे डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी – होळीनिमित्त नागरिकांमध्ये मोठ्या उत्साहाचा वातावरण बघायला मिळते. यानिमित्ताने काही तरुण होळीच्या दिवशी नशा करून वाहन चालवणे, हुल्लडबाजी करतात अशा तरुणांवर आता पोलिसातर्फे गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिली आहे. कोरोनाची लाट ओसरल्यामुळे यंदाचा होळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजी नगर मध्ये धावणी मोहल्ला, गुलमंडी, औरंगपुरा, छावणी, बेगमपुरा, भावसिंगपुरा, कॅनॉट, सिडको , शिवाजीनगर गारखेडा परिसर पडेगाव कोकणवाडी हर्सूल टीव्ही सेंटर इत्यादी भागांमध्ये मोठ्या उत्साहाने होळी सण साजरा केला जातो.

होळी सण साजरा करत असताना अनेक तरुण नशा पाणी करत असतात त्यासोबतच दुचाकी चालवत असतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासोबतच रंग खेळताना हुल्लडबाजी करतात. तसेच रंग न खेळणाऱ्या नागरिकांवरती बळजबरीने रंग फेकला जातो यातून वाद होण्याची शक्यता असते. त्यामुळे असं करणाऱ्या तरुणांवर किंवा नागरिकांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, अशी माहिती पोलिस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांनी दिली आहे.  होळी आणि रंगपंचमी हा सण आपल्याकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो प्रत्येकाने हा सण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करावा मात्र या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रत्येक नागरिकांनी याचं भान राखणे गरजेचे आहे. सण साजरा करत असताना आपल्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी.

COMMENTS