Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पावसाची हुलकावणी,शेतकर्‍याचे डोळे आभाळाकडे

अंबाजोगाई - अनेक दिवस उलटून गेले अंबाजोगाई तालुक्यात पावसाने हुलकावणी दिली आहे.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.ज्या शेतकर्‍यांनी पेरणी केली त्

क्षारपड जमीन सुधारणा प्रकल्पाची कामे तातडीने सुरू : ना. जयंत पाटील
अतिवृष्टीमुळे बाधित शेतजमिन दुरुस्तीची कामे जिल्हा प्रशासनातर्फे सुरु : शेखर सिंह
चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला मिळतोय जादा भाव

अंबाजोगाई – अनेक दिवस उलटून गेले अंबाजोगाई तालुक्यात पावसाने हुलकावणी दिली आहे.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.ज्या शेतकर्‍यांनी पेरणी केली त्या शेतकर्‍यांना बियाणे उगवण्याची तर न पेरणार्‍या शेतकर्‍यांना पेरणीयोग्य पाऊस कधी पडेल याची चिंता लागली आहे.
जवळपास 88 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला आहे. मध्यतंरी झालेल्या पावसाने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला. थोडी उघडीप मिळाल्याने घाईघाईत पेरणी करून घेतली. मात्र आता  नुसते वारेच सुटल्याने पेरलेलेही उगवते की नाही याची चिंता लागली आहे. तर ज्या शेतकर्‍यांनी पेरणी केली नाही, असे शेतकरी मोठ्या पावसाची वाट पहात बसले आहेत. पावसाने ओढ दिल्याने पेरणीचा हंगाम लांबला आहे. पहिल्या पावसात शेतकर्‍यांनी खते, बियाणे खरेदी करून ठेवले. मात्र, पावसाने ओढ दिल्याने शेतकर्‍यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. आतापर्यंत झालेल्या पेरणीत मोठ्या टक्केवारीत  सोयाबीनचा पेरा झाला आहे. उर्वरित क्षेत्रावर तर सोयाबीनशिवाय इतर पिक घेणे कठीण होणार आहे.तालुक्यातील काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला त्यातच शेतकर्‍यांनी उन्हाळी शेतीची मशागत पुर्ण करून पेरण्याही उरकल्या आता पाऊस पडतो याची वाट बघत आहे.  पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्ग चिंतातूर झाला असून खरीप हंगामात काही ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. वरूणराजाच्या आगमनास होत असलेला विलंब व भूगर्भातील पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत चालल्याने उन्हाळी पिकांच्या वाढीवर त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे.  ऑगस्ट महिना सुरू झाला तरी म्हणावा तसा पाऊस नाही. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने पाण्याची कमरता जाणवली नाही. हवामान खात्याने यंदा जाहीर केलेल्या अंदाजाने शेतकरी सुखावला होता. थोडक्या पावसाने जमीन ओली केली मात्र आता पावसाने दडी मारल्याने या पिकास पाणी कमी पडू लागले पेरलेले उगवेल काय यामुळे शेतकरी चिंतातुर आहे. गेली दोन वर्षे खरिपाच्या पेरणीसाठी वेळेवर पाऊस झाला होता. यामुळे पैसे देणारे पीक म्हणून ओळखल्या जाणार्‍या सोयाबीनचा पेरा जास्त क्षेत्रावर झाला आहे  गेली दोन वर्षे समाधानकारक पाऊस झाल्याने भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली होती. त्याचा परिणाम विहीर बागायत क्षेत्रातदेखील ऊसाची लागवड  मोठ्या प्राणावर झाली आहे. मात्र, आता पावसाने ओढ दिल्याने या पिकास पाणी कमी पडू लागले आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी बर्‍यापैकी ऊसाची लागवड असल्याने त्यांची मदार विहिरीच्या पाण्यावर असते. मात्र आता पाऊस लांबल्यामुळे विहीरीचे पाणी पिकाला पुरेनासे झाले आहे. आता चांगला पाऊस झाल्यासच उर्वरीत खरिपाची पेरणी होऊ शकेल. असा अंदाज शेतकरी वर्गातून व्यक्त होतआहे.

COMMENTS